एक्स्प्लोर

Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?

Parbhani Zilla Parishad : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी परभणीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे.

Parbhani Zilla Parishad : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी परभणीच्या (Parbhani) राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. भाजपला (BJP) सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोठी राजकीय खेळी करत विविध पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या घडामोडींमुळे परभणी जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक येत्या 18 मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. सध्या राज्याचे अधिवेशन सुरू असल्यामुळे प्रमुख नेते मुंबईतच असल्याने याच ठिकाणी राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

Parbhani Zilla Parishad : सत्तास्थापनेसाठी 28 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक

परभणी जिल्हा परिषदेमध्ये एकूण 54 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे 24, राष्ट्रवादी काँग्रेसचे 15, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 6, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 5, काँग्रेसचे 3 आणि 1 अपक्ष सदस्य आहेत. सत्तास्थापनेसाठी 28 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे.

Parbhani Zilla Parishad : भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न

भाजपकडे सर्वाधिक 24 जागा असून त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी चार सदस्यांची गरज आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यापूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेसह सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने राजकीय डावपेच आखत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Parbhani Zilla Parishad : शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याची ऑफर

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिंदे गटाच्या शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याची ऑफर दिली आहे. त्याबदल्यात उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहील, तर सभापतीपद उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला देण्याचे संभाव्य समीकरण ठरवण्यात आले असल्याची चर्चा आहे.

Parbhani Zilla Parishad : 24 सदस्यांना ठाण्यातील हॉटेलमध्ये थांबवलं

या नव्या समीकरणासाठी राष्ट्रवादीने संख्याबळही एकत्र केल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे 15, उद्धव ठाकरे गटाचे 6, काँग्रेसचे 2 आणि 1 अपक्ष असे एकूण 24 सदस्य सध्या ठाणे येथील एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिंदे गटाचे 5 सदस्य मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. हे सर्व सदस्य एकत्र आल्यास एकूण 29 सदस्यांचे संख्याबळ तयार होऊ शकते.

Parbhani Zilla Parishad : भाजप राष्ट्रवादीचा डाव उधळून लावणार?

दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आणि शिंदे गटाच्या तीनही जिल्हाप्रमुखांची बैठकही पार पडल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत संभाव्य सत्तासमीकरणांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीच्या या रणनीतीमुळे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजप राष्ट्रवादीचा हा डाव उधळून लावणार का, की राष्ट्रवादी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात यशस्वी ठरणार, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Baba Khan: मोठी बातमी : सोशल मिडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग; मुंब्रामध्ये खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget