एक्स्प्लोर

Ajit Pawar camp NCP Candidate list: अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही

Ajit Pawar camp Candidate list: धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना, आंबेगावमधून आशुतोष काळे यांना, कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी 38 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवारांची (Ajit Pawar camp candidate list) साथ देणाऱ्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश नाही. पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे अजितदादा गटातील या बड्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. पहिल्या उमेदवारी स्थान न मिळालेल्या अजितदादा गटाच्या नेत्यांमध्ये सुनील टिंगरे (Sunil Tingre), नवाब मलिक यांचा समावेश आहे.

सुनील टिंगरे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार आहेत. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातामध्ये सुनील टिंगरे यांची भूमिका वादग्रस्त राहिली होती. अशातच वडगाव शेरी मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपचे जगदीश मुळीक हेदेखील इच्छूक आहेत. त्यामुळे वडगाव शेरीची जागा भाजप आणि अजितदादा गटापैकी कोणाच्या वाट्याला जाणार, याचा फैसला अद्याप होऊ शकलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत वडगाव शेरी मतदारसंघाचा समावेश नसल्याचे सांगितले जाते.

तर दुसरीकडे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जेलवारी करुन आलेले आणि भाजपची नाराजी असलेल्या नवाब मलिक यांना शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून तर त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी 100 टक्के मिळणार, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या नावाचा समावेश नाही. किंबहुना अजितदादा गटाच्या पहिल्या उमेदवारी यादीत मुंबईतील एकाही जागेचा समावेश नाही. केवळ ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नजीब मुल्ला यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.


अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवारी यादीतील 38 उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे

बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
 कागल- हसन मुश्रीफ 
परळी- धनंजय मुंडे
 दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन-  आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
 उदगीर- संजय बनसोडे 
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
 सिन्नर- माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
 अहमदनगर शहर- संग्राम जगताप
 इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
 शहापूर- दौलत दरोडा
 पिंपरी- अण्णा बनसोडे
 कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
 अकोले - किरण लहामटे
 वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
 चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
 हडपसर- चेतन तुपे
 देवळाली- सरोज आहिरे
चंदगड - राजेस पाटील
 इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
 अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
 पाथरी- निर्णला विटेकर
मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

आणखी वाचा

इंदापूरमध्ये पुन्हा काँटे की टक्कर! हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात तिसऱ्यांदा दत्तामामा भरणे मैदानात

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget