Uday Samant : ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे, कॉपीबहाद्दरांवर कारवाई होणारच
विद्यार्थ्यांना वाटत असेल तर ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे. हा विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे,
Uday Samant : "जर ऑनलाइन परीक्षांमध्ये कॉपी करण्याचे प्रमाण वाढत असेल आणि ते जर पुराव्यानिशी सिद्ध झाल्याच्या तक्रारी आल्या, तर त्या विद्यार्थ्यांवर नक्की कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना वाटत असेल तर ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे. हा विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे, असं वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी केलंय. चिपळूणमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आणखी काय म्हणाले सामंत?
ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे, कॉपीबहाद्दरांवर कारवाई होणारच
ऑनलाइन परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा प्रकरण समोर आल्यानंतर ऑफलाइन देखील परीक्षा आम्हाला सुरू करावे लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑनलाईन परीक्षेत कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, त्याच्यामध्ये कोचिंग क्लासेस ग्रुप असुदे, वैयक्तिक असूदेत कोणीही असू देत..तो कॉपीला प्रवृत्त करत असेल तर त्याच्यावर पोलिस कारवाई होणारच असे सामंत म्हणाले.
ऑनलाइन परीक्षा पूर्ण बंद करता येणार नाही
ऑनलाइन परीक्षा बंद करण्याचा काही प्रश्न येत नाही, ऑनलाईन परीक्षा या ऑनलाईन जाहीर केलेल्या आहेत.. एका ठिकाणी असं घडलं म्हणजे सगळी कडे होतय असा भाग आहे.. पण ज्या ठिकाणी होते तिथे कारवाई केली जाणार..
टप्प्याटप्प्यानं ऑनलाईन परीक्षांचा पर्याय थांबवणार
एबीपी माझानं ऑनलाइन परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा पंचनामा केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठानं एक मोठा निर्णय घेतला. मुंबई विद्यापीठ आता टप्प्याटप्प्यानं ऑनलाईन परीक्षांचा (Online Exam Scam) पर्याय थांबवणार आहे. आता टप्प्या-टप्प्याने ऑनलाईन परीक्षा बंद करून ऑफलाईन परीक्षेकडे जात आहोत अशी आज प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.
चिपळूणमध्ये म्हाडाची घरे उभारण्यात येणार
चिपळूणमध्ये हायवेलगतची जी म्हाडा ची जागा आहे. त्या ठिकाणी अल्प आणि अत्यल्प अशा दोन प्रकारचे सदनिका बांधल्या जातील. आज मला सांगताना आनंद होतोय की, जी मुहूर्त त्यावेळी मी रोवलेली होती त्याला महाविकास आघाडी सरकारचा पूर्ण केलं. 28 कोटी रुपयाचं संकुल ते मंजूर केलेला आहे त्याच टेंडर देखील आता सुरु होतय.. आणि काही दिवसांमध्ये ते काम सुरू होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हाडाच्या अत्यल्प आणि अत्यंत सदनिका आहेत, त्यांच्यामध्ये काही सदनिका आहेत, त्यात काही टक्के सदनिका हे पत्रकारांसाठी ठेवलेले होते आणि तो देखील निर्णय म्हाडाने क्लिअर केला. त्यामुळे चिपळूणच्या आणि जिल्ह्यातल्या पत्रकारांना दापोलीला अठरा कोटी रुपयांच्या आणि चिपळूणला अठ्ठावीस कोटी रुपयांच्या सदनिका बांधतोय..या सदनिकांमध्ये चांगल्यापैकी घरं ही पत्रकार बांधवांना येथे मिळतील. तो जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी आजही होणार आहे आणि ते पैसे मंजूर झालेले आहेत..
नारायण राणेंवर टीका
राणेंच्या पत्रकार परिषदेला खासदार विनायक राऊतांनी उत्तर दिले आहे. आता कोणाला नोटीस कधी निघणार आहे हे त्यांना कळायला लागलं तर ती यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, हे मला नाही त्यांना कळते म्हणून त्या यंत्रणेवर किंवा त्या पत्रकार परिषदेत जास्त बोलू नये.
मी स्पष्ट सांगतो कोणाचं घर पाडण्यासाठी किंवा कोणाच्या घराची चौकशी लावण्यासाठी मी साधा फोन केला असेल किंवा अन्य काही गोष्टी केले असतील तर सिद्ध झालं तर मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे मी असलं पाप करायला जात नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणाची गरज पडत आहे कोणाची गरज नाही कोणाची गरज अशी बांधलेली असते सहा मजले की सात मजले आहेत ते मला माहिती पण नाही आणि मी असलं राजकारण करत नाही मी मैदानात निवडणुकीच्या वेळी उत्तर देणारा कार्यकर्ता आहे तरी कोणाचा तर कुणाच घर किती मोठ आहे आणि कोणाचे घर किती छोट आहे या बाबतीत मी कोणाकडे तक्रार केली नाही कोणालाही पाठीशी घातले..
तर उद्धव ठाकरे हे देशातील एक नंबरचे उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पुढे आले नसते...
मुख्यमंत्री यांनी जर सुडाचे राजकारण केलं असतं तर काल झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील एक नंबरचे उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पुढे आले नसते मला असं वाटतंय. महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरे साहेबांचे नेतृत्व स्वीकारलेलं आहे.
संबंधित बातम्या:
ABP Majha Impact : ऑनलाईन परीक्षेत कॉपीसाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार, उदय सामंतांची माहिती
ऑनलाईन परीक्षेतील कॉपी बहाद्दरांचा 'एबीपी माझा'कडून पंचनामा, विद्यार्थ्यांनी पैसे मोजून ऑनलाईन उत्तर मिळवल्याचं उघड
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI