NEET PG 2023 Application: NEET PG अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स
NEET PG 2023 Application: NEET PG 2023 परीक्षेला बसू इच्छिणारे सर्व उमेदवार माहिती पुस्तिकेद्वारे निर्धारित पात्रता, फी स्ट्रक्चर आणि इतर महत्त्वाची माहिती तपासू शकतात.
![NEET PG 2023 Application: NEET PG अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स nbe neet pg 2023 application begins check important details information brochure marathi news NEET PG 2023 Application: NEET PG अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/fbb21462631f8852f82553131816ac251671168366679571_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NEET PG 2023 Application: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) आज, 05 जानेवारी 2023 पासून NEET PG 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे. यासाठी, नोंदणी लिंक अधिकृत वेबसाईट natboard.edu.in वर देण्यात आलेली आहे. NBEMS नं 05 मार्च 2023 रोजी मास्टर ऑफ सर्जरी (MS), डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD) आणि PG डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी NEET PG परीक्षा आयोजित करण्याची घोषणा केली होती.
NEET PG 2023 परीक्षेला बसू इच्छिणारे सर्व उमेदवार माहिती पुस्तिकेद्वारे निर्धारित पात्रता, फी स्ट्रक्चर आणि इतर महत्त्वाची माहिती तपासू शकतात. अर्ज प्रक्रिया 05 जानेवारी (PM 3 PM) पासून सुरू होईल आणि 25 जानेवारी 2023 (PM 11:55) पर्यंत ऑनलाईन सुरू राहील.
महत्त्वाची माहिती
इच्छुक उमेदवारांकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी केलेले प्रोव्हिजनल/स्थायी MBBS पदवी प्रमाणपत्र, MCI किंवा राज्य वैद्यकीय परिषदेनं जारी केलेले प्रोव्हिजनल/स्थायी नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
NEET PG 2023 ची परीक्षा 05 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तर 31 मार्च 2023 रोजी निकाल जाहीर केला जाईल. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एम्स (AIIMS), पीजीआयएमईआर (PGIMER), निमहांस (NIMHANS), एससीटीआईएमएसटी (SCTIMST) आणि जिपमर (JIPMER) वगळता भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये MD, MS किंवा पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेसमध्ये प्रवेश मिळेल.
टेंटेटिव्ह शेड्यूल
NBEMS नं NEET PG 2023 परीक्षेचं तात्पुरतं वेळापत्रक जारी केलं आहे. या वेळापत्रकानुसार, NEET PG 2023 परीक्षा 05 मार्च 2023 रोजी आणि फेलोशिप इन नॅशनल बोर्ड (FNB) एग्झिट परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च 2023 रोजी आयोजित केली जाईल. DNB किंवा DrNB फायनल प्रॅक्टिकल परीक्षा डिसेंबर 2022 फेब्रुवारी, मार्च किंवा एप्रिल 2023 रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)