MPSC : राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेवर 'सीसीटीव्ही'ची नजर, दोषी आढळल्यास उमेदवारी रद्द करणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (Maharashtra Public Service Commission) पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 ला सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे.
MPSC : राज्यातील पेपर फुटीची (Paper Leak) प्रकरणे लक्षात घेता आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणाऱ्या परीक्षेला सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका वाटल्यावर काही मिनिटांतच ती व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवरून बाहेर येणे, सामूहिक कॉपी याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयोगाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
सीसीटिव्ही (CCTV Camera) कॅमेरांच्या माध्यमातून कडक देखरेख
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 ला सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावर तसेच त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारावई करण्यात येणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 मध्ये उमेदवारांकडून होऊ शकणारे संभाव्य गैरप्रकार विचारात घेऊन आयोगाकडून सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त.... (1/2)
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 29, 2022
उमेदवारी रद्द करणार
उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेकरीता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. या अगोदर आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
संबंधित बातम्या :
आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई, आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या विद्यार्थ्यांना एमपीएससीचा इशारा
MPSC Recruitment 2022 : MPSC मध्ये बंपर भरती, 'या' तारखेपासून करता येणार अर्ज
Pune NCP Protest For MPSC Student: MPSC चा नवा अभ्यासक्रम दोन वर्षांनी लागू करा; राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI