(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MPSC Recruitment 2022 : MPSC मध्ये बंपर भरती, 'या' तारखेपासून करता येणार अर्ज
MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या 427 रिक्त जागांसाठी भरती जारी केली आहे. इच्छुक उमेदावर लवकरात लवकर अर्ज करु शकतात.
Maharashtra MPSC Medical Officer Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या (Govt Jobs) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) नोकरीची मोठी संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या (MPSC Medical Officer Recruitment 2022) 427 रिक्त जागांसाठी उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत महाराष्ट्र राज्य मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांमधील रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
या तारखेपासून करता येणार अर्ज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया 25 जुलैपासून 2022 सुरु होणार आहे. अर्ज करण्याची लिंक सुरु झाल्यानंतर उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील. त्यासाठी उमेदवारांना mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
अर्ज करण्यासाठीची पात्रता काय?
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कारावा लागेल. 25 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापिठातून एमबीबीएसची (MBBS) पदवी प्राप्त केलेली असावी. शिवाय इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षादरम्यान असावं.
कशी असेल निवड प्रक्रिया?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या (MPSC Medical Officer Recruitment 2022) 427 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. जास्त अर्ज आल्यास निवडीसाठी परीक्षा घेतली जाऊ शकते.
अर्जाचे शुल्क किती?
या भरतीसाठी सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्जाचे शुल्क 394 रुपये आणि आरक्षित श्रेणीसाठी अर्जाचे शुल्क 294 रुपये आहे.