Reality Check : बारावी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान कशाप्रकारे राबवलं जातंय?
Maharashtra HSC Exam : बारावीच्या परीक्षा शंभर टक्के कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंडळाकडून अभियान राबवलं जात आहे. दरम्यान या कॉपीमुक्त अभियानाचा रिअॅलिटी चेक एबीपी माझाने केला आहे.
Maharashtra HSC Exam : राज्यभरात आजपासून बारावी बोर्ड परीक्षेला (HSC Exam) सुरुवात झाली आहे. ही परीक्षा शंभर टक्के कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंडळाकडून अभियान राबवलं जात आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी बैठे पथक, भरारी पथक परीक्षा केंद्रावर असेल.
परीक्षार्थींची शंभर टक्के तपासणी
परीक्षा केंद्राच्या आत मध्ये जाण्याआधी शंभर टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची झाडाझडती घेतली जाणार आहे. त्यासाठी सुद्धा विशेष यंत्रणा परीक्षा केंद्रांवर सज्ज आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाय कुठल्या प्रकारचा गोंधळ निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतरावरील झेरॉक्स दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहेत.
एबीपी माझाकडून कॉपीमुक्त अभियानाचा रिअॅलिटी चेक
दरम्यान या कॉपीमुक्त अभियानाचा रिअॅलिटी चेक एबीपी माझाने केला आहे. खरंच या कॉपीमुक्त अभियानातून दिलेल्या सूचनांचा काटेकोरपणे पालन होत आहे का याचा आढावा घेण्यात आला. यादरम्यान विद्यार्थ्यांची तपासणी करणाऱ्या शिक्षकांसोबत बातचीत करण्यात आली. शिक्षकांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे...
- केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी आणि गैरप्रकार केल्यास कुठल्या प्रकारे शिक्षा होऊ शकते याच्या सूचना दिलेल्या आहेत
- विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींसाठी बैठे पथक तैनात ठेवण्यात आलेलं आहे
- शिक्षक, शिक्षकांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची 100 टक्के तपासणी करुन, झाडाझडती करुनच त्यांना केंद्राच्या आत प्रवेश दिला जात आहे
- पुस्तक, नोट्स, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या सुद्धा परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवल्या जात आहेत.
- बैठे पथकाकडून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे.
- पोलीस बंदोबस्त प्रत्येक परीक्षा केंद्रावर असेल जेणेकरुन गोंधळ निर्माण झाल्यास नियंत्रण ठेवता येईल
- झेरॉक्स मशीन बंद ठेवण्यात आलेले आहे. स्टेशनरी दुकान विद्यार्थ्यांच्या गरजांपुरते सुरु ठेवण्यात आले आहे.
राज्यातील 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार
आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील. सकाळी सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरु झाली असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचं होतं तर दुपारची सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
VIDEO : Mumbai : 12th Board Exams : बारावीच्या विद्यार्थ्यांनी कॉपी केल्यास गुन्हा दाखल होणार
संबंधित बातमी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI