एक्स्प्लोर

Buldhana Paper Leak Case : पेपर फोडण्यासाठी मास्तरांचा खास 'खुपिया' व्हॉट्सअॅप ग्रुप; जाणून घ्या पेपर फुटीचा घटनाक्रम 

Buldhana Paper Leak Case : बुलढाण्यात मास्तरांनीच 12 वीचा गणिताचा पेपर फोडल्याचे समोर आले आहे. या पेपर फुटीचा घटनाक्रम आता समोर आला आहे.  

Buldhana Paper Leak Case : बारावी पेपरफुटी प्रकरणी (HSC Paper Leak Case) पोलिसांनी अजून दोघांना ताब्यात घेतलं आहे. दोघेही बुलढाण्यातील (Buldhana) लोणार तालुक्यातील (Lonar Taluka) खासगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती मिळत आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आतापर्यंत सातवर पोहोचली आहे. तसेच, अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शकील शे. मुनाफ (रा.लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षकांची नावं आहेत. आता या पेपरफुटीचा संपूर्ण घटनाक्रम पुढे आला आहे. 

लोणार येथील एका खासगी शाळेवरील शिक्षक शे. अकील शे. मुनाफ यांनी 3 मार्ज रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा मोबाईलवर फोटो काढून तो किनगावजट्टू येथील गजानन शेषराव आडे यांच्यासह अनेकांना पाठविला. त्यांनतर गजानन आडे यांनी शेंदुर्जन येथील वच्छगुलाब बहुउद्देशीय संस्थेचे संचालक तथा शिक्षक गोपाल दामोदर शिंगणे यांना पाठविला. गोपाल शिंगणे याने खुपीया या गृपवर तो व्हायरल केला . तो 12 वीची परीक्षा देत असलेला आदिनाथ काळूसे यांच्या मोबाईलवर आला. आदिनाथ काळूसे याच्या मोबाईलवरुन कोणीतरी पवन नागरे यांना तो पेपर व्हायरल केला. पवन नागरे याने गणेश शिवानंद नागरे याला फॉरवर्ड केला आणि गणेश नागरज यांनी तो माध्यमांना पाठविला. आजपर्यंतच्या तपासापर्यंत पोलिसांनी या साखळीचा उलगडा केला आहे. 

या प्रकरणातील अंकुश पृथ्वीराज चव्हाण आणि शे. अकील शे. मुनाफ हे खासगी शिक्षण संस्थेवर शिक्षक आहेत. या दोघांचा यात समावेश असून त्यांना अटक करण्यात आली असून 10 मार्चपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. गणेश नागरे, पवन नागरे , गणेश पालवे  (रा. भंडारी ), संस्था चालक गोपाल शिंगणे , संस्था चालक गजानन आडे किनगावजट्टू या सात आरोपीतांचा या प्रकरणात समावेश आहे. 

चौकशीसाठी एसआयटीची स्थापना 
 
बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे.

 या SIT पथकात एक वरिष्ठ अधिकारी, दोन अधिकारी तर चार कर्मचारी आहेत.

 या पथकाचं नेतृत्व मेहकरचे पोलिस उपअधीक्षक विलास यमावार हे करणार आहेत.

पोलिस उपअधीक्षक विलास यामावार हे पोलिस अधिकारी होण्यापूर्वी बारा वर्ष शिक्षक होते. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्याने तात्काळ म्हणजे छत्तीस तासात सात आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केलीय. त्यात चार हे खासगी शाळेतील शिक्षक आहेत.

या खासगी शाळेतील शिक्षकांचा पेपरफुटीत सहभाग निष्पन्न झाल्याने आता या शाळेतील इतर कुणाचा सहभाग पेपरफुटीत आहे का? याची चौकशी SIT करणार आहे.

शिवाय या पेपरफुटीचं कनेक्शन राज्यातील इतर ठिकाणी आहे का? मुंबईत एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये हाच पेपर आढळला होता. त्याचा याच्याशी संबंध आहे का?  याची देखील चौकशी सुरू आहे. 

शिवाय या तपासासाठी वेळेचं बंधन नसलं तरी हा तापस लवकरात लवकर करून यातील दोषी कोण याचा शोध घेण्यासाठी आज सकाळ पासूनच SIT कामाला लागली आहे.

विशेष म्हणजे पेपरफुटी प्रकरणात व्हॉट्सअॅपचा वापर करून त्यासाठी "खुपिया " या नावाचा 99 जणांचा ग्रुप बनविण्यात आला होता. 

महत्वाच्या बातम्या 

Paper Leak : पेपरफुटीचं मायाजाल... बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोन जण अटकेत, एकूण आरोपींची संख्या सातवर 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaZero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Embed widget