HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन, कसं कराल डाऊनलोड?
HSC board exam : बारावी बोर्ड परीक्षा 4 मार्च पासून सुरु होणार आहे. दरम्यान परीक्षेचे हॉल तिकीट उद्या दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.
HSC board exam : बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च पासून तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. दरम्यान दहावी आधी पार पडणाऱ्या बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट उद्या (बुधवारी) दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.
बारावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कसं कराल डाऊनलोड?
- सर्वात आधी तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट ब्राऊजरमधून www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जा.
- त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करु शकता.
दरम्यान संबधित ऑनलाइन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. हॉल तिकीटात विषय आणि माध्यम बदला संदर्भात दुरुस्त्या असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या असल्याची माहितीही शासनाने दिली आहे. हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ती बाबत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने 'द्वितीय प्रत'( डुप्लिकेट)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.
बारावी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक-
- 4 मार्च - इंग्रजी
- 5 मार्च - हिंदी
- 7 मार्च - मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
- 8 मार्च - संस्कृत
- 10 मार्च - फिजिक्स
- 12 मार्च - केमिस्ट्री
- 14 मार्च - माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
- 17 मार्च - बायोलॉजी
- 19 मार्च - जियोलॉजी
- 9 मार्च- ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
- 11 मार्च - सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
- 12 मार्च - राज्यशास्त्र
- 12 मार्च - अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
- 14 मार्च - अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
- 19 मार्च - अर्थशास्त्र
- 21 मार्च - बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
- 23 मार्च - बँकिंग पेपर - 1
- 25 मार्च - बँकिंग पेपर - 2
- 26 मार्च - भूगोल
- 28 मार्च - इतिहास
- 30 मार्च - समाजशास्त्र
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra HSC Time Table 2022 : बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जारी; 4 मार्च रोजी पहिला पेपर, पाहा संपूर्ण Time Table
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतीनंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही
- Maharashtra HSC SSC Exam : दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी आता साडेतीन तासांचा वेळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI