एक्स्प्लोर

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतीनंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही

HSC,SSC Exam Late Fees : परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब फी भरावी लागत होती.

HSC,SSC Exam Late Fees : परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली. राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परिक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये तांत्रिकदृष्ट्या येत असलेल्या अडचणी पाहता शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी सभागृहात मांडली. सर्वश्री सदस्य अभिजित वंजारी, अनिल तटकरे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इ.१०वी व इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर  फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नाही. कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षेसाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे. तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. आतापर्यंत इ.१२ वीचे १४,३१,६६७ आणि इ.१० वीचे १५,५६,८६१ आवेदन पत्रे प्राप्त झाले आहेत. शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करून परीक्षा फॉर्म भरून घेण्याबाबत सर्व शाळा, कॉलेजना कळवण्यात येईल यासंदर्भात जाहीर प्रसिद्धी वर्तमानपत्रांद्वारे देण्यात येईल, अशी माहितीही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी  दिली. 

दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी आता साडेतीन तासांचा वेळ -
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक जाहीर झालंय. तसंच यंदा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्ध्या तासाचा अधिक वेळ देण्यात आला आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमामुळं विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली आहे. त्यामुळं तीन तासांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात येणार आहे. ॲानलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम तर झालाच शिवाय त्यांचे हस्ताक्षरं खराब होण्यावर देखील झाला आहे. शिवाय पेपर सोडविण्याची देखील सवय मोडली आहे. अधिक स्पष्ट करून सांगायचं तर 80,90 आणि 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकांसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. 50, 60आणि 70 गुणंच्या प्रश्नपत्रिकांसाठी 15 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 26 हजार 960 विद्यार्थी तर दहावीसाठी 15 लाख 27 हजार 762  विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget