HSC SSC Exam : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात बोर्ड आज जाहीर करणार भूमिका
HSC SSC Exam : वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च पासून तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षांसंदर्भात आज सकाळी साडेअकरा वाजता मंडळाकडून पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केली जाणार आहे.
पुणे : बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहेत. वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च पासून तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षांसंदर्भात आज सकाळी साडेअकरा वाजता मंडळाकडून पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत परीक्षा ऑफलाईन कि ऑनलाईन याबाबत माहिती देण्यात येईल.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या आयोजनासंदर्भात या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाणार आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता पुणे येथे बोर्डाच्या मुख्य कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे. दहावीची परीक्षा 15 मार्च पासून तर बारावीची परीक्षा ही 4 मार्चपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी 15 फेब्रुवारी पासून इयत्ता बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक तोंडी परीक्षांना सुरुवात होणार आहे.
दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत. याबाबत मंडळाकडून शनिवारी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने काल संमती दिली. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच होणार यावर शिक्तामोर्तब झाले आहे. आजच्या पत्रकार परिषदेमधून याची माहिती दिली जाईल.
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होईल. तर बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्याबरोबरच बारावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे. तर दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra HSC Time Table 2022 : बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जारी; 4 मार्च रोजी पहिला पेपर, पाहा संपूर्ण Time Table
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतीनंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही
- Maharashtra HSC SSC Exam : दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी आता साडेतीन तासांचा वेळ
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI