पार्टनरकडूनचं विश्वासघात.. लाखो रुपयांचा माल हडपला
लोणीकंद परिसरातून एका टेक्स्टाईलच्या दुकानातून पार्टनरनेच तब्बल 95 लाख रुपयांचा माल चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : जिल्ह्यातील लोणीकंद परिसरातून एका टेक्स्टाईलच्या दुकानातून पार्टनरनेच तब्बल 95 लाख रुपयांचा माल चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासाअंती एकाला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून जवळपास 50 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरेंद्र कुमार चिमणाराम सेन उर्फ फुडालीया (वय 34) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ संदीपान मगर (वय 30 वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे.
इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करणं महागात! अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्याला सहा महिन्यानंतर बेड्या
फिर्यादी संदिपान मगर यांनी सुरेंद्र कुमार चिमणाराम सेन उर्फ फुडालीया आणि नरेंद्र कुमार चिमनाराम सेन उर्फ फुडालिया यांच्यासोबत भागीदारी करत टेक्स्टाईलचे दुकान टाकले होते. परंतु, भागीदारीतील हे दुकान सुरू असताना आरोपींनी फिर्यादी यांना न सांगता दुकानातील 95 लाख रुपये किंमतीच्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि इतर साहित्य चोरून नेले होते.
112 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरटा अटकेत, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
विकलेल्या मालावरुन लागला तपास
या गुन्ह्याचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांना आरोपींनी पुण्यातील काही दुकानांमध्ये हा माल विकला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुण्यातील शनिपार चौकातून महालक्ष्मी मार्केट या दुकानातून दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. परंतु, आरोपी मात्र फरार होते. अखेर यातील एक आरोपी अहमदनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अहमदनगर येथून आरोपीला अटक केली. त्याने एका दुकानात ठेवलेला 42 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. लोणीकंद पोलीस अधिक तपास करीत आहे.
प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या कॅबचालकाला बेड्या, अॅपमध्ये फेरबदल करत मोठ्या प्रमाणात भाडं वसूल