Nagpur Crime Story : आईने 'नको त्या अवस्थेत' पकडले, पोलिस ठाण्यात पोहोचले
मुलीच्या घरात 'नको त्या अवस्थेत' असताना आईने एंट्रील घेतली अन् दोघांची पंचाईत झाली. तरुणीच्या आईने मुलाविरुद्ध तक्रार देण्याची भूमिका घेतल्याने युवकावर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
![Nagpur Crime Story : आईने 'नको त्या अवस्थेत' पकडले, पोलिस ठाण्यात पोहोचले Girl was caught by her mother along with a minor in condition Nagpur Crime Story : आईने 'नको त्या अवस्थेत' पकडले, पोलिस ठाण्यात पोहोचले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/25/fe1a5da258c965626adea158dcb454e4_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : मुळ उत्तरप्रदेशातील दहावित शिकणाऱ्या युवकासोबत नागपूरातील एमबीएचे शिक्षण घेतलेल्या चोवीस वर्षीय तरुणीची ओळख झाली. नियमित बोलणे सुरु झाले. त्यानंतर एकमेकांपासून दूर असणाऱ्या दोघांनी भेटण्याचे ठरविले. मात्र मुलाला भेटण्यासाठी मुलीने नागपूरात बोलावले. मुलीच्या घरात 'नको त्या अवस्थेत' असताना आईने एंट्रील घेतली आणि दोघांची पंचाईत झाली. मात्र तरुणीच्या आईने मुलाविरुद्ध तक्रार देण्याची भूमिका घेतल्याने अल्पवयीन युवकावर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार अमित (काल्पनिक नाव) आणि निधी (काल्पनिक नाव) ह्यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांचे नियमित बोलणेही सुरु झाले. नंतर एकमेकांचे व्हॅट्सअॅप क्रमांकावर चॅटिंग सुरु झाली. या दरम्यान मुलाने मुलीले महागडे गिफ्टही पाठवले. एकमेकांपासून विरहात असलेल्यांची भेट ठरली. 25 नोव्हेंबर 2021 रोजी पहिल्यांदा अमित नागपूरात आला. त्याला येण्यासाठी तरुणीने पैसेही दिले होते अशी माहिती आहे. दोघेही नागपूरातील सदर परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबले. दोघांमध्ये सहमतीने सर्वचकाही घडले. नंतर पुन्हा 30 जून रोजी निधीने अमितला नागपुरला बोलावले. दोघेही सदर येथील हॉटेलमध्ये भेटलेही. दुसऱ्या दिवशी वडील नोकरी वर आणि आई नातेवाईकांकडे जाणार असल्याने तिने अमितला घरी नेले. मात्र आई एक तासांतच परत आल्याने तिने दोघांनाही 'नको त्या अवस्थेत' पकडले. चिडलेल्या आईने पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यासाठी सांगितले. आईचे रौद्ररुप बघून निधीनेही पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना तिच्या आईला ते दोघे 'नको त्या अवस्थेत' दिसले. दोघांचीही पंचाईत झाली. मात्र, तरुणीच्या आईने मुलाविरुद्ध तक्रार देण्याची भूमिका घेतल्याने तरुणीच्या अल्पवयीन प्रियकराविरुद्ध पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी निधीच्या तक्रारीवरून अमितवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमित अल्पवयी असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
तक्रारीनुसार अनेकदा बलात्कार
निधीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार 25 नोव्हेंबर 2021 ते 30 जून 2022 दरम्यान अल्पवयीन युवकाने अनेकवेळा निधीसोबत बलात्कार केला. पोलिसांनी भादवी 376 (2)एन, 504 नुसार गुन्हा नोंदविला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)