एक्स्प्लोर

तारण म्हणून ठेवलेली गाडी मूळ मालकानेच चोरली, अंबरनाथ पोलिसांकडून चोरीचा बनाव उघड 

Ceime News : कर्ज म्हणून घेतलेले पैसे परत करावे लागू नयेत आणि आपली गाडी आपल्याला फुकटात परत मिळावी यासाठी मूळ मालकानेच गाडी चोरीचा बनाव केला. परंतु, अंबनाथ पोलिसांनी हा बनाव उघड केला.

Ceime News : कर्ज घेताना तारण म्हणून ठेवलेली गाडी मूळ मालकानेच चोरून नेल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे गाडी चोरल्यानंतर मूळ मालकाने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्याचा हा बनाव उघड करत मालकासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. 

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या प्रकाश पंजाबी याच्या वडिलांना एप्रिल महिन्यात हार्ट अटॅक आल्यामुळे त्याला पैशांची तातडीने गरज होती. यावेळी त्याने त्याचा मित्र मुरली टेकचंदानी याच्याकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या मोबदल्यात त्याने त्याची ह्युडाई आय 10 ही गाडी मुरली टेकचंदानी याच्याकडे तारण म्हणून ठेवली होती. ही गाडी मुरली टेकचंदानी याचा भाऊ बंटी टेकचंदानी हा वापरत होता. अंबरनाथ पूर्वेतील गोविंद पुलाजवळ ही गाडी तो उभा करून ठेवायचा. 29 सप्टेंबर 2022 रोजी रात्री ही गाडी बंटी याने नेहमीच्या ठिकाणी उभी करून ठेवली होती. मात्र दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबर रोजी त्याला ही गाडी तिथे दिसून आली नाही. त्यामुळे त्याने याबाबत मोठा भाऊ मुरली याला सांगितलं. यावेळी मुरली यांनी जवळपासच्या परिसरात गाडी शोधली. शिवाय गाडीचा मूळ मालक प्रकाश पंजाबी याला देखील फोन करून तू गाडी घेऊन गेला आहेस का? अशी विचारणा केली. त्यावर प्रकाशने आपण गाडी नेलेली नसल्याचं सांगितलं. त्यामुळे मुरली टेकचंदानी आणि प्रकाश पंजाबी हे दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार केली. 

चोरीचा बनाव उघड

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांपुढे ही गाडी शोधण्याचं आव्हान होतं. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास सुरू केला. यामध्ये ज्यावेळी ही गाडी चोरीला गेली त्यावेळी प्रकाश पंजाबी याचं मोबाईल लोकेशन गाडी उभी असलेल्याच भागात दाखवत असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे प्रकाश पंजाबी याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याची कसून चौकशी करताच त्याने आपणच आपली गाडी चोरून नेल्याची कबुली दिली. 

कर्जाची रक्कम परत करावी लागू नये चोरली कार

कर्ज म्हणून घेतलेले पैसे परत करावे लागू नयेत आणि आपली गाडी आपल्याला फुकटात परत मिळावी, यासाठी त्याने सुरज विश्वकर्मा आणि तरुण पाटील या दोघांना गाडीची त्याच्याकडे असलेली चावी दिली आणि ती गाडी तिथून घेऊन येण्यास सांगितलं. त्यानंतर ही गाडी त्याने लपवून ठेवली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने गाडी चोरल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी ही गाडी जप्त केली. या प्रकारामुळे मालकानेच स्वतःचीच गाडी चोरत बनाव रचल्याचा प्रकार शिवाजीनगर पोलिसांनी उघड केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane on Disha Salian Aaditya Thackeray : सत्यमेव जयते! तुम्ही खोटं लपवू शकत नाही : नितेश राणेZero Hour Disha Salian : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
Embed widget