एक्स्प्लोर

Bhandara Gang Rape Case : अद्याप मुख्य आरोपी फरार, तीन पोलिसांवर कारवाई; 'भंडारा' प्रकरणात आतापर्यंत काय झालं?

Bhandara Crime : भंडारा अत्याचार प्रकरणी पोलिसांनी केलेलं दुर्लक्ष भोवलं असून त्यामुळेच पीडितेला दुसऱ्यांदा अत्याचाराला सामोरं जावं लागल्याचं स्पष्ट झालं आहे. 

भंडारा: राज्याला हादरवून टाकणाऱ्या भंडारा रेप केसमध्ये आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत दोघांना निलंबित करण्यात आलं आहे. पीडिता तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार झाला त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये आली होती, पण तिच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचं समोर आलं. त्यानंतर तिच्यावर दुसऱ्यांदा अत्याचार झाला. आता या प्रकरणी पोलिसांवर टीकेची झोड उटवण्यात येत आहे.

दोन पोलीस अधिकारी निलंबित तर एका महिला कर्मचाऱ्याची बदली
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिसाना पीडित महिलेकडे झालेलं दुर्लक्ष भोवलं असून या प्रकरणात भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदली केली गेली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक दिलीप कुमार घरडे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लखन उईके यांना तडका-फडकी निलंबित करण्यात आले असून महिला पोलीस कर्मचारी खोब्रागडे यांची भंडारा मुख्यलयाच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. 

ती पीडिता पोलीस स्टेशनमध्ये आली होती: संदीप पाटील
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील बलात्कार घटनेची पीडिता 31 जुलैच्या संध्याकाळी मुरमाडी जवळ महिला पोलीस पाटीलला आढळली होती. त्यानंतर त्या पोलीस पाटीलने 112 क्रमांकावर कॉल करून लाखनी पोलीस स्टेशनची 112 क्रमांकाची गाडी तिथे पाठवली होती. त्या गाडीत पीडीतेला लाखनी पोलीस स्टेशनमध्ये रात्री आणण्यात आले होते. पीडिता पोलीस स्टेशनमध्ये आली होती हे सत्यच असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. 31 जुलैच्या रात्री पीडिता पोलीस स्टेशनमध्येच होती आणि 1 तारखेच्या सकाळी निघून गेली असेच घडले अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली. 

काय आहे प्रकरण? 
गोंदिया जिल्ह्यातील 35 वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधमांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी नेत सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी कारधा पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली आहे. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी हा अजूनही पोलिसांच्या हाती न लागलेला नाही. भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावात 2 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. 

पोलिसांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळेच महिलेवर पुन्हा अत्याचार झाल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. तसेच, पीडिता 31 जुलैला लाखनी पोलीस ठाण्यात आली असतानाच पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. जर ती पोलीस ठाण्यात पोहोचली होती, तर तिच्यावर तिथून पळून जाण्याची वेळ का आली? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. 

काय घडलं त्या दोन दिवसांत? 
पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. दरम्यान, 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं. ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्यासाठी ती निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. पण या नराधमानं पुढे तिला घरी सोडलं नाही, तर  गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला. 

पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या (आरोपी क्र. 2) आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतही घरी सोडण्याच्या बहाण्यानं पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीनं आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती. 

पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहिलं. विवस्त्र, रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्यानं गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्यानं भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाकडे वर्ग केला आहे.  

पहिल्यांदा अत्याचार घडल्यानंतर महिला पोलीस स्थानकात गेली होती. पण त्यावेळी पोलिसांनी याप्रकरणाकडे दुर्लक्ष केलं, म्हणूनच दुसरी घटना घडली. महिला पोलीस स्थानकातून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं आहे. त्यामुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget