Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
आजच्या काळात आरोग्य विमा (Health Insurance) खूप महत्त्वाचा आहे. आरोग्य विमा दावा करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
Insurance Claim : आजच्या काळात आरोग्य विमा (Health Insurance) खूप महत्त्वाचा आहे. हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत उपचार खर्चाच्या ओझ्यापासून वाचवते. परंतु अनेक वेळा तुम्ही विमा पॉलिसी घेता, परंतु जेव्हा तुम्ही त्यासाठी दावा करता तेव्हा तो दावा नाकारला देखील जाऊ शकतो. तुम्हा दावा दाखल करताना काही काळजी घेणं गरजेचं असते. तुमचा दावा 5 कारणांमुळे नाकारला जाऊ शकतो. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
'या' पाच चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
चुकीची माहिती देऊ नका
अनेक वेळा, पॉलिसी खरेदी करताना, लोक वय, उत्पन्न, व्यवसाय इत्यादींशी संबंधित चुकीची माहिती विमा कंपनीला देतात. अशा परिस्थितीत, अनेक वेळा कंपन्या त्यांचे आरोग्य विम्याचे दावे नाकारतात. त्यामुळं आरोग्य विम्याचा दावा करताना तुम्ही तुमचं वय, उत्पन्न यासंदर्भातील माहिती योग्य आणि सत्य देणं गरजेचं असतं. अन्यथा तुमचा विम्याचा दावा फेटाळला जाण्याची शक्यता असते.
योग्य वेळेत विमा दावा दाखल करा
विमा दावा करण्यासाठी एक निश्चित वेळ आहे. जर तुम्ही त्या वेळेत दावा केला नाही तर तुमची विमा दावा कंपनीचा दावा नाकारु शकते. त्यामुळं योग्य वेळेत विमा दावा दाखल करण्याचा तुम्ही निर्णय घेणं गरजेचं असतं.
तुमच्या आजाराबाबत तुम्ही खरी माहिती विमा कंपनीला देणं गरजेचं
विमा काढताना काही लोक जुनाट आजारांबद्दल माहिती देत नाहीत कारण त्यांना वाटते की यामुळे त्यांचा प्रीमियम वाढेल. पण ही चूक नंतर महागात पडते. अशा परिस्थितीत, विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते. त्यामुळं तुमच्या आजाराबाबत तुम्ही खरी माहिती विमा कंपनीला देणं गरजेचं असतं.
मर्यादेपेक्षा जास्त क्लेम करु नका, कागदपत्रांची योग्य पूर्तता करा
तुम्ही पॉलिसी मर्यादेपेक्षा जास्त क्लेम केला असला तरीही कंपनी तुमचा दावा नाकारते. याशिवाय, दावा करताना पूर्ण कागदपत्रांच्या अभावामुळे दावा नाकारणे देखील शक्य आहे. त्यामुळं मर्यादेपेक्षा जास्त विम्याचा क्लेम करु नका. जेवढा आवश्यक आहे, तेवढ्याच विम्याचा क्लेम करा. तसेच कागदपत्रांची देखील योग्य पूर्तता करा, त्यामुळं देखील विम्याचा दावा फेटाळला जावू शकतो.
पॉलिसीमध्ये अंतर्भूत असलेल्या गोष्टींसाठीच दावा करा
तुमच्या पॉलिसीमध्ये काय कव्हर केले जाईल आणि काय नाही हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. यासाठी पॉलिसीच्या सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. ज्या गोष्टींचा अंतर्भाव नाही अशा गोष्टींसाठी तुम्ही दावा केल्यास, तुमचा दावा स्पष्टपणे नाकारला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
आरोग्य विमा धारकांना मोठा दिलासा, IRDAI च्या 'या' नव्या निर्णयामुळे आता 3 तासांत क्लेम सेटलमेन्ट!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )