नर्सरीनं बदललं महिलेचं जीवन, फळे आणि भाजीपाला पिकांच्या लागवडीतून मिळवतेय लाखो रुपये
आज आपण एका महिलेची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. या महिलेनं फळे आणि भाजीपाला पिकातून स्वत:ची आर्थिक प्रगती साधलीय. निलीमा असं या महिलेचं नाव आहे.
Success Story : अलीकडच्या काळात शेती क्षेत्रात (Agriculture Sector) नवनवीन प्रयोग होत आहेत. तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. शेती क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील यश मिळवताना दिसतायेत. आज आपण अशाच एका महिलेची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. या महिलेनं फळे आणि भाजीपाला पिकातून स्वत:ची आर्थिक प्रगती साधलीय. निलीमा असं या महिलेचं नाव आहे. या महिलेनं नर्सरीमध्ये फळे आणि भाजीपाला पिकांची लागवड केलीय. या माध्यमातून ही महिला मोठा नफा मिळत आहे.
फळे आणि भाजीपाला्यासह रोपवाटीकाही तयार
निलीमा देवी या बिहारमधील बांका जिल्ह्यातील पोखरिया गावातील रहिवासी आहेत. त्यांनी नर्सरीमध्ये फळे आणि भाजीपाला लागवड केली आहे. यातून त्या चांगला नफा मिळवत आहेत. याचबरोबर निलीमा या नर्सरीमध्ये रोपवाटीका देखील तयार करत आहेत. यातून चांगले पैसे त्यांना मिळत आहेत.
सुरुवातीला फळे आणि भाजीपाला पिकाच्या लागवडीचे प्रशिक्षण
निलीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 पासून त्यांनी शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अनेकांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीपासूनच त्यांचा कल हा भाजीपाला लागवडीकडे होता. कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्यांना भाजीपाला लागवडीच्या तंत्रज्ञानाबरोबच त्याच फायदेही सांगितले. त्यानंतर निलीमा यांनी फळे आणि भाजीपाला पिकाच्या लागवडीचे प्रशिक्षण देखील घेतलो.
मिरची, कोबी, कोबी, भेंडी, कारले यांची रोपे तयार केली जातात
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, फळ आणि भाजीपाला पिकांच्या लागवडीतून निलीमा देवी या वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवतात. फळ आणि भाजीपाल्यासह रोपवाटीकेच्या माध्यमातून निलीमा वर्षाला चार लाख रुपये मिळवतात. निलीमा या विविध प्रकारती रोपे देखील तयार करतात. यामध्ये मिरची, कोबी, कोबी, भेंडी, कारले यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
गुलाबानं आणला तरुणाच्या आयुष्यात 'सुगंध', आज करतोय लाखो रुपयांची कमाई