Share Market Opening : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 17450 चा टप्पा
Share Market Opening : शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत.जागतिक शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण आहे,.

Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात (Share Market Opening Bell) आज चांगली सुरुवात झाली आहे. प्री-ओपनिंग सत्रात बाजारात तेजी दिसून आली. जागतिक शेअर बाजारातही खरेदीचा जोर दिसत असल्याने भारतीय शेअर बाजारावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाला.
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 200 हून अधिक अंकांनी वधारत 58,571.28 अंकांवर खुला झाला. एनएसईचा निफ्टी निर्देशांक 74.95 अंकांनी वधारत 17,463.10 वर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 276 अंकांनी वधारत 58,627.21 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 78 अंकानी वधारत 17,466.45 अंकावर व्यवहार करत होता.
आज सकाळच्या सत्रात बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टी 50 मधील 38 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 12 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. बँक निफ्टीतही खरेदीचा जोर दिसत आहे. बँक निफ्टी 150 अंकांनी वधारला असून 38,138 अंकांवर व्यवहार करत आहे.
निफ्टीतील एफएमसीजी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, रियल्टी, ऑइल अॅण्ड गॅसच्या शेअर दरात तेजी दिसत आहे. आयटी शेअर निर्देशांकात मोठी उसळण दिसून आली. आयटी शेअर 1.69 टक्क्यांनी वधारला. हेल्थकेअर निर्देशांकात 0.68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, ऑटो क्षेत्रात जवळपास 0.25 टक्क्यांची तेजी दिसत आहे.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे. यामध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, बजाज फायनान्स, एचएसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, डॉ. रेड्डीज, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात वाढ झाली आहे.
आज, टायटन, पॉवरग्रीड, एचयूएल, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारूती सुझुकी, एसबीआय आणि एनटीपीसीच्या शेअर दरात घसरण झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
