एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर

Maharashtra Budget 2026: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.

Maharashtra Budget 2026: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (6 मार्च) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026) सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे अजित पवारांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केलेली होती. मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला.

आजचा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्षे पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. सामाजीक समरसता वर्ष म्हणुन साजरा केला जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच काम पुर्ण झालं आहे. तर राज्यात काही योजना सुरु केल्या जातील, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

माझं अंतःकरण जड झालं आहे. अजितदादा यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहीली. त्यांना श्रद्धांजली म्हणुन त्यांच भव्य स्मारक उभारलं जाईल. नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प त्याना सादर करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच अजित पवार आज आपल्यात नाहीत त्याच्या जाण्यामुळे त्यांची पोकळी भरून निघू शकत नाही. काम करणारा माणूस अशी त्यांची ओळख होती. लवकरच त्यांच स्मारक बनवण्यात येईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. महाराष्ट्राच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय, पाहा संपूर्ण यादी...(What is cheap, what is expensive? Check Full List Maharashtra Budget 2026 Marathi News)

महाराष्ट्राच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पातून काय स्वस्त झालं? (What is cheap maharashtra budget 2026)

  1. मधुमेहावरील उपचार
  2. कर्करोगवरील औषधं
  3. क्रीडा साहित्य
  4. वैद्यकीय उपकरणे
  5. सौर पॅनल

महाराष्ट्राच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पातून काय महाग झालं? (what is expensive maharashtra budget 2026)

  1. दारु
  2. सिगारेट
  3. तंबाखूजन्य पदार्थ
  4. वाहतूक कर वाढवल्यामुळे गाडी घेणं महाग होणार

महाराष्ट्रातील अर्थसंकल्पात 10 मोठ्या घोषणा- (Maharashtra Budget 2026)

1. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. ⁠महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार आहे. 

2. अजित दादा पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणून अजित दादा पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

3. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे.  ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडली.  २४५० किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून २३ हजार पूलांचं काम हाती घेतलं आहे.  मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

4. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा हा सहभाग करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे. 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयची मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे. 

5. राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.  प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर बसवणार,  बांबू विकास प्रकल्प वाढवणार,  परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे. मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली नवं स्टील हब म्हणून उदयास आले आहे. 

6. मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु,  पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर आहे.  जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

7. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार आहोत. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहोत.  

8. मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग उभारणार आहोत. 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत. 2029 पर्यंत 165 किमी मेट्रो मार्गिका तयार करणार आहोत. दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार आहोत. वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार, पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

9. कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50  हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.

10. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Budget 2026 Live Updates : देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात काय काय?, A टू Z माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
महागाईचा दणका! विमान प्रवास महागणार? पेट्रोल आणि डिझेलनंतर आता ATF च्या किंमतीत मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती
महागाईचा दणका! विमान प्रवास महागणार? पेट्रोल आणि डिझेलनंतर आता ATF च्या किंमतीत मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
मुकुल अग्रवाल समर्थित  KHPL कंपनीकडून 235 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा; एफआयआयचा हिस्सा वाढला
मुकुल अग्रवाल समर्थित  KHPL कंपनीकडून 235 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा; एफआयआयचा हिस्सा वाढला

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Embed widget