Share Market Closing : शेअर बाजारात आपटी बार, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांना चार लाख कोटींचा फटका
Share Market Closing Updates : शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसून आला. बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चार लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
Share Market Closing Updates : आज, बुधवारी भारतीय शेअर बाजारात (Share Market) विक्रीचा दबाव दिसून आला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे आज सेन्सेक्स (BSE Sensex) जवळपास 1000 अंकांनी घसरला होता. निफ्टीतही (NSE Nifty) मोठी घसरण दिसून आली. आज झालेल्या शेअर बाजारात झालेल्या घसरणीतून कोणतेही सेक्टर बचावले नाही. जागतिक बाजारातील घसरणीचे भारतीय शेअर बाजारावर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले.
आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 928 अंकांनी आपटला. सेन्सेक्स निर्देशांक 59 हजार 745 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 272 अंकांच्या घसरणीसह 17 हजार 554 अंकांवर बंद झाला.
बाजारात आज झालेल्या व्यवहारात, सगळ्याच सेक्टरमध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, फार्मा, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू, इन्फ्रा आदी सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3606 कंपन्यांपैकी 953 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, 2520 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
निफ्टी 50 मधील फक्त दोनच कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, 47 कंपन्यांचे शेअर दर घसरले. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त एकाच कंपनीच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, उर्वरित 29 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. जवळपास 250 कंपन्यांच्या शेअर दराला आज लोअर सर्किट लागले.
आजच्या ट्रेडिंग सत्रात फक्त ITC चे शेअर्स 0.42 टक्क्यांनी, बजाज ऑटो 0.09 टक्क्यांनी आणि Divis Lab 0.07 टक्क्यांनी वधारत बंद झाले. अदानी एंटरप्रायझेस 10.58 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स 6.19 टक्क्यांनी, ग्रासिम 3.61 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 2.83 टक्क्यांनी घसरले. अदानी समूहाच्या 7 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले.
बँक निफ्टीत घसरण
बँक निफ्टीमध्ये आज मोठी घसरण दिसून आली. बँक निफ्टीत 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 39,974 अंकांवर स्थिरावला.
BSE MidCap | 24,318.97 | 24,547.63 | 24,255.46 | -1.16% |
BSE Sensex | 59,744.18 | 60,462.90 | 59,681.55 | -1.53% |
BSE SmallCap | 27,611.51 | 27,886.99 | 27,543.55 | -1.09% |
India VIX | 15.59 | 15.92 | 12.38 | 11.28% |
NIFTY Midcap 100 | 30,211.00 | 30,517.55 | 30,124.35 | -1.13% |
NIFTY Smallcap 100 | 9,244.80 | 9,342.65 | 9,219.90 | -1.14% |
NIfty smallcap 50 | 4,169.60 | 4,222.80 | 4,163.90 | -1.35% |
Nifty 100 | 17,335.00 | 17,539.95 | 17,307.10 | -1.53% |
Nifty 200 | 9,082.65 | 9,185.85 | 9,066.70 | -1.48% |
Nifty 50 | 17,554.30 | 17,772.50 | 17,529.45 | -1.53% |
गुंतवणूकदारांना मोठा फटका
बाजारात आज झालेल्या घसरणीचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. आज दिवसभरातील व्यवहारात चार लाख कोटींचा चुराडा झाला. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 261.34 लाख कोटी रुपये इतके झाले. मंगळवारी, 265.23 लाख कोटी इतके बाजार भांडवल होते. याचाच अर्थ जवळपास 3.91 लाख कोटींची घट झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: