(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी की जुनी? कोणती कर संरचना तुमच्यासाठी योग्य; प्राप्तिकर विभागाने जारी केले 'टॅक्स कॅल्क्युलेटर', अशी करा तुलना
IT department released tax calculator: इनकम टॅक्सच्या Calculator मुळे कर भरणाऱ्याचं काम अधिक सुलभ होऊन त्यांना कराचं नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे.
IT department released tax calculator: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना कर संरचना (New Tax Regime) आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. नवी कर संरचना आकर्षित करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये देखील केले आहे. जर तुम्ही देखील ओल्ड टॅक्स रिजीम (Old Tax Regime) आणि नव्या टॅक्स रिजीमपैकी कोणती निवडावी यामध्ये गोंधळ होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. करदात्याला नव्या आणि जुन्या कर संरचनेपैकी कोणती निवडावी? याचा निर्णय घेतना मदत करण्यासाठी आयकर विभागाने टॅक्स कॅलक्युलेटर (Tax Calculator) लॉन्च केले आहे.
इनकम टॅक्सच्या calculator मुळे कर भरणाऱ्याचं काम अधिक सुलभ होऊन त्यांना कराचं नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच कोणती कर संरचना त्यांच्यासाठी योग्य आहे, याचा देखील निर्णय घेणे सोपे होणार आहे. सोमवारी प्राप्तिकर विभागाने एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, individual/ HUF/ AOP/ BOI/ Artificial Juridical Person (AJP) च्या कलम 115 बीएसीनुसार नवी कर संरचना आणि जुनी कर संरचना यांची तुलना करणारे कॅल्क्युलेटर आता उपलब्ध झाले आहे. इनकम टॅक्सच्याच्या वेबसाईटवर हे कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे.
Tax Calculator is now live!
— Income Tax India (@IncomeTaxIndia) February 20, 2023
A dedicated tax calculator to check Old Tax Regime vis-à-vis New Tax Regime for Individual/HUF/AOP/BOI/Artificial Juridical Person(AJP) as per Section 115BAC can now be accessed on the IT Dept website.
Pl check the link below:https://t.co/dy04iY4oj5 pic.twitter.com/JF4VfmXQw4
Tax Calculator घोषणा खूप आधीच करण्यात आली होती. कर भरणाऱ्याचं काम अधिक सुलभ होऊन त्यांना कराचं नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे एक चांगला पर्याय निवडण्यासाठी करदात्याला मदत मिळणार आहे.
नव्या कर संरचनेचे फायदे
Concessional Income Tax Regime आकर्षित करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी अनेक नव्या बदलांची घोषणा केली आहे. मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवीन नियमांतर्गत आयकर दर आणखी कमी केले आहेत आणि 50,000 च्या स्टॅंडर्ड डिडक्शनला परवानगी दिली आहे. करदात्यांनी लक्षात ठेवावे की, त्यांना जर जुनी कर प्रणाली नको असेल तर त्यांच्यासाठी आता नवीन कर प्रणाली पर्याय असेल. सध्या पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले करदाते कोणताही आयकर भरत नाहीत. त्यांना तशी सूट आहे. आता ही सवलत नवीन कर प्रणाली अंतर्गत सात लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना मिळणार आहे. नवीन नियमांतर्गत पगाराच्या उत्पन्नावर 50,000 च्या स्टॅंडर्ड डिडक्शनसह, पगारदार व्यक्तींना 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.