चंदनाची शेती करा, एका एकरात 30 कोटी मिळवा; नेमकं कसं कराल नियोजन?
चंदनाच्या झाडांची लागवड करुन तुम्ही मोठा नफा मिळवू शकता. काही काळातच तुम्ही कोट्यावधी रुपये मिळवू शकता.
Sandalwood Farming: अलिकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. पारंपारिक शेतीला बगल देत शेतकरी आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. एक अशीच श्रीमंत करणारी शेती म्हणजे चंदनाची शेती (Sandalwood Farming). चंदनाच्या झाडांची लागवड करुन तुम्ही मोठा नफा मिळवू शकता. काही काळातच तुम्ही कोट्यावधी रुपये मिळवू शकता. दरम्यान, चंदनाची लागवड कशी करायची? चंदनाची लागवड करताना काय काळजी घ्यावी? यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात.
कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड
देशातील कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड केली जाते. या लावडीतून अनेक शेतकरी लाखो रुपये मिळवतात. चंदनाचे लाकूड खूप मौल्यवान समजले जाते. त्याचा सुंगध देखील इतर झाडांपेक्षा सुंदर असतो. त्यापासून विविध सुंगधी वस्तू बनवल्या जातात. त्यामुळं तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही देखील चंदनाची लागवड करु शकता.
चंदनाची लागवड कोणत्या काळात करावी?
दरम्यान, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, चंदनाची लागवड करायची असेल तर कोणत्या काळात करावी? तर चंदनाची लागवड कोणत्याही कालावधीत केली तरी अडचण येत नाही. मात्र, तुम्ही जे चंदनाचे रोप लावला ते दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीचे असावे. चंदनाची लागवड केल्यानंतर त्याची योग्य ती निगा राखावी. दरम्यान, ज्या ठिकाणी चंदनाचे झाड लावले आहे, त्याठिकाणी पाणी साचू नये याची काळजी घ्यावी.
एका एकर चंदनाच्या झाडांपासून कोट्यावधी रुपयांची कमाई
चंदनाचे लाकूड खूप मौल्यवान आहे. यापासून विविध वस्तू, सुंगधी साधने तयार केली जातात. त्यामुळं चंदनाला मोठी मागणी असते. बाजारात चंदन खूप महाग आहे. चंदनाच्या एका झाडापासून पाच ते सहा लाख रुपये मिळू शकतात. एका एकरात चंदनाची 600 झाडे बसू शकतात. या 600 झाडापासून शेतकऱ्याला 30 कोटी रुपये मिळू शकतात. त्यामुळं एका एकरात जरी तुम्ही चंदनाची झाडे लावली तरी तुम्ही कोट्याधीश होऊ शकता. विशेष म्हणजे चंदनाच्या झाडाच्या लागवडीसाठी तुम्हा कोणत्याही प्रकारची बागायती जमिनीची दरज नसते. ओसाड असलेल्या माळरानावर देखील तुम्ही चंदनाच्या झाडाची लागवड करुन लाखो रुपयांचा नफा मिळवू शकता. फक्त यासाठी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.
महत्वाच्या बातम्या: