
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Price today : सोनं पुन्हा 50 हजारावर, काय आहे नेमकं कारण?
Gold Price today : आज मंगळवारी, सोन्या आणि चांदीच्या फ्युचर्स किंमतीत वाढ झाली आहे. तुमच्या भागातील दर जाणून घ्या.

Gold Price today : आज सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झालेली आहे. सोन्याचा दर 1,910 रुपयांनी वाढून 51,410 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर, चांदीच्या दरात 323 रुपयांनी वाढून 64,556 रुपये प्रतिकिलो झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) वर सोन्याचे फ्युचर्स 0.57 टक्क्यांनी किंवा 286 रुपयांनी वाढून 50,202 रुपये प्रति10 ग्रॅमवर होते. चांदीचा भाव 0.50 टक्क्यांनी वाढून 323 रुपये प्रति किलो 64,556 झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर :
स्पॉट सोन्याचा भाव 0.1 टक्क्यांनी वाढून 1,871.52 डॉलर प्रति औंस झाला. मागील सत्रात, सराफा किमतींनी 16 नोव्हेंबरपासून $1,873.91 ची सर्वोच्च पातळी गाठली होती. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी वाढून $1,873.40 वर पोहोचले. इतर मौल्यवान धातूंपैकी स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी वाढून $23.87 प्रति औंस, तर प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी वाढून $1,030.11 वर पोहोचला. पॅलेडियम 0.3 टक्क्यांनी वाढून $2,368.33 वर पोहोचला आणि सोमवारी जवळपास दोन आठवड्यांतील सर्वोच्च पातळी गाठली.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर :
तुम्ही या दरांनी फार सोप्या पद्धतीने घरबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो मेसेज येईल त्यामधून तुम्ही सोन्या-चांदीचे आजचे दर जाणू शकता.
अशा पद्धतीने चेक करू शकता सोन्याची शुद्धता :
जर तुम्हाला सोन्याची शुद्धता चेक करायची आहे. तर यासाठी सरकारतर्फे एका अॅपची सुविधा करण्यात आली आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) चेक करू शकता. इतकेच नाही, तर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही संबंधित कोणतीही तक्रारदेखील नोंदवू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'या' सोप्या टीप्स फॉलो करा
- 399 रूपयांपासून सुरु होतात Jio चे 'हे' प्लॅन, सोबतच मिळणार Netflix, Amazon Prime चं फ्री सबस्क्रिप्शन
- लवकरच जिओची 5G सेवा 1000 शहरांमध्ये सुरू होणार, भारतासह अमेरिकेत 5G सोल्यूशन टीम तैनात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
