(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'या' सोप्या टीप्स फॉलो करा
गुगल क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा ब्राउजर तुम्हीही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुमचा ब्राउजर हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी काय करावे लागेल, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Google Chrome : सध्याच्या युगात आपण इंटरनेटवर इतके अवलंबून आहोत, की सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण इंटरनेटच्या मदतीनेच करतो. म्हणजे अगदी शॉपिंगपासून ते बँकिंगपर्यंत सर्व इंटरनेच्या मदतीनेच केलं जातं. त्यामुळे आपण वापरत असलेला इंटरनेट ब्राउजर सुरक्षित असणं फार महत्त्वाचं आहे. त्यात जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा ब्राउजर म्हणजे गुगल क्रोम (Google chrome) आणि हाच ब्राउजर हॅक होण्याची भिती इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) व्यक्त केली आहे.
त्यांनी जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये गुगल क्रोम वापरणाऱ्यांना काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत. ज्या वापरुन तुमचा गुगल क्रोम ब्राउजर हॅक होण्यापासून वाचवता येईल. दरम्यान सध्या बहुतेकजण वापरत असलेल्या गुगल क्रोमचे व्हर्जन जुने असल्याने हा लवकर हॅक होऊन सर्व खाजगी माहिती लीक होऊ शकते. त्यामुळे कंपनीने ब्राउजर अपडेट करण्याचा सल्ला देत ही कृती कशाप्रकारे करु शकतो तेही सांगितलं आहे.
असा कराल गुगल क्रोम अपडेट-
- सर्वात आधी गुगल क्रोम ब्राउजर ओपन करा.
- त्यानंतर उजवीकडच्या वरच्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा.
- त्याठिकाणी सेटिंग्स हा ऑप्शन दिसल्यावर त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर डावीकडच्या बाजूस सर्व ऑप्शन्समध्ये शेवटचा ऑप्शन About Chrome असा दिसेल.
- या About Chrome ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा ब्राउजर अपडेट होईल.
- यानंतर ब्राउजर बंद करुन पुन्हा चालू करा, ज्यानंतर तुमचा गुगल क्रोम अपडेटेड आणि सेफ असेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Digital Payment Tips : UPI, NEFT आणि IMPS वर व्यवहार अयशस्वी झाल्यास 'या' पद्धतींनी पैसै परत मिळवा
- Netflix च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, सबस्क्रिप्शन आता फक्त 149 रुपये
- Dangerous Apps : तुमच्या स्मार्टफोनमधील 'हे' अॅप धोकादायक, आताचं करा अनइंस्टॉल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha