एक्स्प्लोर

लवकरच जिओची 5G सेवा 1000 शहरांमध्ये सुरू होणार, भारतासह अमेरिकेत 5G सोल्यूशन टीम तैनात

परदेशात आलेलं 5G नेटवर्क लवकरच भारतात देखील लॉन्च होणार असून विविध नेटवर्क कंपन्या यासाठी प्रयत्नशील आहेत.

मुंबई : रिलायन्स जिओ देशातील एक हजार शहरांमध्ये 5जी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी तिच्या 5G नेटवर्कवर आरोग्यसेवा आणि औद्योगिक ऑटोमेशनची चाचणी करत आहे. 5G नेटवर्कवर डेटा वापर जास्त असेल म्हणून कंपनी उच्च वापर होणारा परिसर किंवा भाग आणि ग्राहक ओळखण्यासाठी हीट मॅप्स, 3D नकाशे आणि रे ट्रेसिंग तंत्रज्ञान वापर करण्यात येतो आहे. जेणेकरून ग्राहकांच्या गरजेनुसार मजबूत नेटवर्क तयार करता येईल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही निकालात ही बाब समोर आली आहे. मात्र, कंपनीने अद्याप शहरांच्या नावांची यादी जाहीर केलेली नाही.

भारतासह यूएसमध्ये 5G सोल्यूशन्स टीम तैनात

जिओने ग्राहक आधारित 5G सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी अनेक टीम्स तयार केल्या आहेत. या टीम भारताप्रमाणे अमेरिकेत तैनात करण्यात आल्या आहेत. जेणेकरून या टीम्स विविध प्रकारचे 5G सोल्यूशन्स विकसित करू शकतील. कंपनीच्या विश्वासाला या टीम्स पात्र ठरतील असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या टीम 5G सोल्यूशन्स तयार करतील, ज्या तांत्रिक स्तरावर जगाच्या बरोबरीचे किंवा त्याहून चांगलं देतील. याशिवाय, कंपनीने युरोपमध्ये एक टेक्नॉलॉजी टीम देखील तयार केली आहे जी 5G ची तयारी करेल.

कंपनी 5G च्या जलद उपयोजनासाठी पायाभूत सुविधा देखील वेगाने वाढवते आहे. त्या ठिकाणी फायबर आणि विजेची उपलब्धताही वाढवली जात आहे. जेणेकरून जेव्हा 5G रोलआउटची वेळ येईल तेव्हा त्यात कोणताही व्यत्यय किंवा विलंब होणार नाही.

ARPU 151.6 रुपयांपर्यंत वाढला

रिलायन्स जिओचा ARPU (दर महिन्याला प्रति ग्राहक सरासरी महसूल) देखील वाढला आहे. दरमहा प्रति ग्राहक एआरपीयू 151.6 रुपये झाला आहे. याचे कारण चांगले सिम एकत्रीकरण आणि नुकतीच सुमारे 20 टक्‍क्‍यांची किंमत वाढ असल्याचे मानले जाते. डेटा आणि व्हॉईस ट्रॅफिकमध्ये वाढ झाली आहे, म्हणजे दरमहा प्रति वापरकर्ता कॉलिंग. जिओ नेटवर्कवरील प्रत्येक ग्राहकाने दरमहा 18.4GB डेटा वापरला आणि सुमारे 901 मिनिटे बोलले.

जिओने या तिमाहीत 84 लाख ग्राहक गमावले

जिओने या तिमाहीत सुमारे 12 दशलक्ष ग्राहक आपल्या नेटवर्कमध्ये जोडले. सिम एकत्रीकरणाच्या प्रयत्नांमुळे, जिओने त्या वापरकर्त्यांना यादीतून काढून टाकले आहे जे सेवा वापरत नव्हते. यामुळे या तिमाहीत जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या 84 लाखांनी कमी झाली आहे. जिओची ग्राहक संख्या आता 42 कोटी 10 लाखांच्या जवळपास आहे. दुसरीकडे, जिओ फायबरच्या ग्राहकांची संख्याही 50 लाखांच्या पुढे गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget