399 रूपयांपासून सुरु होतात Jio चे 'हे' प्लॅन, सोबतच मिळणार Netflix, Amazon Prime चं फ्री सबस्क्रिप्शन
Jio Postpaid : जर तुम्हाला कमी किंमतीत जास्त डेटा आणि जास्तीत जास्त OTT प्लॅटफॉर्मचा लाभ घ्यायचा असेल, तर Jio च्या काही पोस्टपेड स्कीम्स आहेत.
Reliance Jio Best Plan : जिओने (Reliance Jio) मागील वर्षी प्रीपेड रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले होते. पण, रिलायन्स जिओ अजूनही यूजर्ससाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. जेणेकरून यूजर्सना कमी किंमतीत जास्त सुविधा मिळू शकतील. कंपनीचे काही पोस्टपेड प्लॅन आहेत ज्यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि डेटा सारखे चांगले पर्याय तर मिळतातच, पण त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. अशाच काही स्कीम्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
1. 399 रुपयांची स्किम :
Jio पोस्टपेड प्लस प्लानमध्ये यूजर्सना दरमहा 75 GB डेटा मिळतो. जर तुमचा डेटा संपला तर प्रत्येक 1 GB डेटासाठी 10 रुपये आकारले जातात. डेटा व्यतिरिक्त, तुम्हाला प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सारखे फायदे देखील मिळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. 399 रूपयांमध्ये ही स्किम आहे.
2. 599 रुपयांची स्किम :
599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एका महिन्यासाठी 100 GB डेटा मिळतो. याशिवाय 200 GB डेटा रोलओव्हरही केला जातो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, मेसेज सारखे फीचर्स देखील मिळतात. हा प्लॅन नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टारवर मोफत सबस्क्रिप्शन देखील देतो.
3. 999 रुपयांची स्किम :
या पोस्टपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि डिस्ने + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. याशिवाय प्लॅनमध्ये 200 GB डेटा समाविष्ट आहे. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही 500 GB पर्यंत डेटा रोलओव्हर करू शकता. यामध्ये कंपनी कुटुंबातील सदस्यांसाठी तीन अतिरिक्त सिम देखील देते.
4. 1499 रुपयांची स्किम :
Jio च्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 1499 रुपयांचा प्लॅन सर्वात वरचा आहे. यामध्ये तुम्हाला 300 GB डेटा मिळेल. जेव्हा तुम्ही निर्धारित मर्यादा ओलांडता, तेव्हा 1 GB डेटा 10 रुपये दराने आकारला जातो. याशिवाय तुम्ही यामध्ये 500 GB डेटा रोलओव्हर करू शकता. वरील स्किमप्रमाणे यामध्ये कुटुंबातील सदस्यांना तीन अतिरिक्त सिम दिले जातील.
महत्त्वाच्या बातम्या :
- Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'या' सोप्या टीप्स फॉलो करा
- Digital Payment Tips : UPI, NEFT आणि IMPS वर व्यवहार अयशस्वी झाल्यास 'या' पद्धतींनी पैसै परत मिळवा
- Dangerous Apps : तुमच्या स्मार्टफोनमधील 'हे' अॅप धोकादायक, आताचं करा अनइंस्टॉल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha