प्रशांत झवेरी Flipkart Health+ चे नवे सीईओ, कंपनीचा घोषणा
Flipkart Health+ : प्रशांत झवेरी यांना हेल्थ, हेल्थ इन्शुरन्स आणि त्या संबंधित क्षेत्रामध्ये 17 वर्षाच्या कामाचा अनुभव आहे.
मुंबई : प्रशांत झवेरी यांची Flipkart Health+ च्या CEO पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशांत झवेरी हे भारतातील वेगाने वाढणाऱ्या आरोग्य सेवा क्षेत्रात फ्लिपकार्टच्या आघाडीचे नेतृत्व करतील. त्यांना हेल्थ, हेल्थ इन्शुरन्स आणि त्या संबंधित क्षेत्रामध्ये 17 वर्षाच्या कामाचा अनुभव आहे. त्यामुळे कंपनीने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
फ्लिपकार्टच्या हेल्थ प्लसमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी प्रशांत झवेरी हे अपोलो हेल्थ अॅन्ड लाईफस्टाईल लिमिटेडचे मुख्य अधिकारी होते. त्या कंपनीच्या विकासामध्ये प्रशांत झवेरी यांचे असलेले योगदान लक्षात घेता फ्लिपकार्टने त्यांना ही संधी दिली आहे. Flipkart Health+ (Plus) संपूर्ण भारतात दर्जेदार व परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा देण्याकरिता एन्ड टू एन्ड डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
#News: Flipkart Health+ appoints Prashant Jhaveri as CEO. Prashant comes with over 17 years of experience in the health, health insurance and allied healthcare sectors
— Flipkart Stories (@FlipkartStories) March 15, 2022
Read more on Newsroom: https://t.co/Odhhvh2DnL@Flipkart pic.twitter.com/aHSJu39VTC
या नियुक्तीनंतर प्रशांत झवेरी म्हणाले की, "देशाच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा वापर करुन आरोग्य इन्शुरन्स सेवा पोहोचवण्यासाठी फ्लिपकार्ट हेल्थ प्लस हे योग्य माध्यम आहे. या ठिकाणी काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. देशातल्या सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात आरोग्य इन्शुरन्स सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील."
नोव्हेंबर 2021 मध्ये Flipkart Health+ चे लॉन्चिंग करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या: