एक्स्प्लोर

Apple layoffs 2023 : अॅपलमध्ये पहिल्यांदाच नोकरकपात होणार, 'या' कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

Apple Layoffs 2023 : आयफोनचं उत्पादन करणारी Apple ही कंपनी काही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. असं झाल्यास अॅपलने केलेली ही पहिलीच नोकरकपात असेल.

Apple Layoffs 2023 : टेक क्षेत्रातील नोकरकपातीचं लोण आता Apple कंपनीतही पसरलं आहे. आतापर्यंत नोकरकपातीपासून (Layoffs) दूर असलेली ही कंपनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. आयफोनचं (iPhone) उत्पादन करणारी ही कंपनी कॉर्पोरेट रिटेल विभागातील काही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. असं झाल्यास अॅपलने केलेली ही पहिलीच नोकरकपात असेल. मंदीमुळे (Recession) गेल्या वर्षभरापासून टेक क्षेत्रात कर्मचारी कपातीचे संकट पाहायला मिळत आहे. ट्विटर,  गुगल, अॅमेझॉन, मेटा यांसारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे.

खरंतर अॅपल कंपनी आतापर्यंत नोकरकपातीपासून दूर राहिली होती आणि इतर मार्गांनी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु आता काही कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार लटकत आहे. Apple च्या डेव्हलपमेंट अँड प्रिझर्व्हेशन विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना या कपातीचा फटका बसणार आहे. दरम्यान कंपनीने मात्र अद्याप या कपातीविषयी अधिकृत माहिती जारी केलेली नाही.

Apple रिटेल स्टोअरच्या जबाबदारी काय?

हा विभाग जगभरातील Apple रिटेल स्टोअर्स तयार करण्यासाठी आणि देखरेखीसाठी जबाबदार आहे. सध्या, किती कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याचा धोका आहे हे निश्चित झालेलं नाही. परंतु ही संख्या कमी असण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. खराब आर्थिक परिस्थिती आणि खर्चामुळे त्रस्त झालेल्या टेक क्षेत्रातील इतर कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना कामावरुन कमी केलं आहे.

दरम्यान, कंपनीकडून ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल ते पुन्हा कंपनीत अर्ज करु शकतात, असं म्हटलं जात आहे. एवढंच नाही तर कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा पगारही दिला जाणार आहे.

अॅपलमध्ये 1.64 लाख कर्मचारी

मागील आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत अॅपलमध्ये 1.64 लाख कर्मचारी काम करत होते. कोविड महामारीच्या काळात कंपनीने गुगल, अॅमेझॉनसारख्या मोठ्या प्रमाणावर लोकांची भरती केली नाही. परंतु यानंतर  Google आणि Amazon सारख्या कंपन्यांना हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करावं लागलं.

हेही वाचा

Indian IT Industry: मंदीचा परिणाम! नव्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात 40 टक्के नोकऱ्यांची घट?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget