Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

सोलापूरमध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ; काळा टी-शर्ट, तोंडाला कपडा.. घरफोडीचं सामान घेऊन फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद
दीपक काटेला जामीन मंजूर, मराठा समाज आक्रमक, पोलीस अधिकारी कटात सामील असल्याचा आरोप
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी दीपक काटेसह एकास जामीन; न्यायालयाकडून अटी व शर्ती
प्रवीण दादांवरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला, 18 जुलैच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा; जन्मजेयराजे भोसले यांची प्रतिक्रिया
अक्कलकोट बंदची घोषणा, आरोपींवर मोक्का? सोलापुरातील मराठा समाजाच्या बैठकीत काय-काय ठरलं?
दीपक काटेच्या कानात अमोलराजे भोसले काय बोलले? राड्यानंतर व्हायरल व्हिडिओवर जन्मजेयराजेंचं स्पष्टीकरण
प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरण! सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत तुफान गोंधळ, एकाला मारहाण, नेमकं घडलं काय? 
प्रवीणदादांना आमच्याबद्दल कोणीतरी गैरसमज करुन देतोय, जन्मेजयराजे भोसलेंचं स्पष्टीकरण, म्हणाले,  त्यांच्याबद्दल असा विचार शक्यच नाही
प्रवीण गायकवाडांच्या हल्लेखोरांचा फैसला मंगळवारी, गंभीर कलमं वाढवणार की सोडून देणार? पोलिसांच्या कृतीकडे लक्ष
तेरा महिन्याच्या बाळाचा तलावात पडून दुर्दैवी मृत्यू; जड अंत:करणाने अंत्यसंस्कार केले, पण मामाचा एका फोननंतर बॉडी उकरुन काढली, नेमकं काय घडलं? 
संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा अखेर मैदानात उतरला, पहिली प्रतिक्रिया
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
Video: ... म्हणून मी आज जिवंत आहे; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया
Video: संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, डोक्यावर ओतली शाई; अक्कलकोटमध्ये गोंधळ
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी होतेय गुरुपौर्णिमा; दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी, पाहा PHOTO
दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोचा चार्जरच्या वायरनं गळा घोटला, नंतर स्वतःच्या गळ्याला दोरी लावली
देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी; सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार; पंढरपूर पालखी महामार्ग रोखलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयानक कांड, महिला एकटी असताना रूमध्ये शिरला अन्...; महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना
वहिनीला भाजपने फोडलं, पश्चाताप होणार, घरातील फुटीनंतर विशाल पाटलांचा एल्गार
सोलापूरमधील हॉटेलमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुरड्यांनी जागेवरच जीव सोडला, आई-वडीलही गंभीर जखमी
मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन, 66 दिवसानंतर सुटका
डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरण: आरोपी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज होणार निर्णय
अबू आझमींचं कोल्हापूरच्या चपलीने तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही; ठाकरेंच्या नेत्याचा थेट इशारा
Sponsored Links by Taboola