एक्स्प्लोर

Rohit Pawar & Rajendra Raut: आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, तुमच्या आजोबांकडे इतकी संपत्ती कुठून आली? राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांना सवाल

Rohit Pawar & Rajendra Raut: राजेंद्र राऊत यांचा रोहित पवारांवर पलटवार. शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची गाडी पेटवून देण्यात आली होती.

Solapur Politics news: रोहित पवार हे अर्ध्या हळकुंडाने शहाणे झाल्यासारखे बोलतात. ते त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यात राजकारण करत असल्याचे भासवत आहेत. पण ते कशा पद्धतीने माहिती घेतात आणि बोलतात किमान ते त्यांनी पाहावे, असे वक्तव्य बार्शीचे (Barshi) माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी केले. रोहित पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचे वाहन जाळण्याच्या प्रकरणावरून सोशल मीडियावरुन राजेंद्र राऊत आणि त्यांच्या मुलाला लक्ष्य केले होते. या जाळपोळ प्रकरणात राजेंद्र राऊत यांचा मुलगा सहभागी असल्याचा संशय रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बोलून दाखवला होता. या आरोपांना राजेंद्र राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

रोहित पवार अर्ध्या हळकुंडाने शहाणे झाल्यासारखे बोलतात. ज्याची गाडी जळाली त्यानेदेखील पोलिसांत अज्ञात लोकांनी गाडी जाळली म्हणून फिर्याद दिली आहे.  गेल्या महिन्यात जो शिवीगाळ झाला, त्यात एका मुलीची छेडछाड झाली म्हणून रणवीर राऊत याने राग व्यक्त केला होता. रणवीर राऊत याचे काम पाहून त्याला बदनाम करण्याचे काम सध्या सुरु आहे. तो स्वतः वकील आहे, त्याच्यावर साधी कोणताही अदखलपात्र गुन्हा(NC) दाखल नाही. त्याने केलेली शिवीगाळअशोभनीय आहे, मी त्या भाषेचे देखील समर्थन करणार नाही. त्या घटनेनंतर देखील मी दोन दिवस रणवीर सोबत बोललेलो नाही, असे राजेंद्र राऊत यांनी म्हटले.

आमचे पूर्वज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, मावळे होते. आम्ही बार्शीत प्लॉटिंग व्यवसाय करून संपत्ती केली, पण तुमचे आजोबा काय होते? त्यांच्याकडून संपत्ती कुठून आली? रणवीर आणि माझ्यावर आता आरोप करता, तर तुम्ही कोणाचे घरं मोडलीत याची माहिती आमच्याकडे देखील आहे, असा इशारा राजेंद्र राऊत यांनी दिला. या सगळ्याला आता रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Rohit Pawar: जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही, रोहित पवारांचा राऊतांना टोला

शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची गाडी पेटवून देण्यात आली होती. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी  उपस्थित केला होता. जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही, ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून शांताराम जाधवर यांना शिवीगाळ केली. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला होता.

आणखी वाचा

अंतर्गत नाराजीतूनच माझा पराभव झाला, येणाऱ्या काळात चुकांची दुरुस्ती करणार : राजेंद्र राऊत 

बार्शीत शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची गाडी जाळली, रोहित पवारांचा माजी आमदार पुत्रावर हल्लाबोल, म्हणाले, जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही  

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर आता OTT वर, क्लायमॅक्स पाहून थरकाप उडेल!
1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर आता OTT वर, क्लायमॅक्स पाहून थरकाप उडेल!
Nashik Accident News: मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
Embed widget