एक्स्प्लोर

Solapur: हृदयद्रावक! पाणी भरलं, मोटरचा प्लग काढण्यासाठी गेली अन् आक्रीत घडलं, विजेच्या झटक्यानं 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

आजूबाजूच्या लोकांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Solapur:सोलापूर शहरातील नीलमनगर भागातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात पाणी भरल्यानंतर मोटरचा प्लग काढण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलीचा विजेचा जोरदार झटका लागून जागीच मृत्यू झाला. समृद्धी सिद्धेश हिरेमठ (वय 13) असं या मुलीचं नाव असून, तिच्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. शॉक लागल्याने मुलीची शुध्द हरपली. आजूबाजूच्या लोकांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. (Solapur News)

 नेमकं काय घडलं?

सोलापूरच्या नीलम नगर परिसरात शनिवारी संध्याकाळी समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही १३ वर्षांची शाळकरी मुलगी घरातल्या कामात मदत करत होती. घरात पाणी भरल्यानंतर ती नेहमीप्रमाणे मोटर बंद करण्यासाठी गेली. मोटरचा प्लग काढण्याच्या क्षणीच तिचा हात ओलसर असल्यानं समृद्धीला विजेचा जोरदार झटका बसला. व ती जागीच कोसळली. शॉक लागल्याचं समजताच आजूबाजूचे व तिच्या घरचे तिच्या दिशेने धावले.तिच्या शरीरावर कोणतीही हालचाल नव्हती. तात्काळ तिला उचलून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती स्पष्ट केलं की, हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या अचानक झालेल्या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

अकोल्यातील 'कप ऑफ कम्फर्ट'मध्ये विवाहित महिलेवर अत्याचार

अकोला शहरातील रणपिसे नगर भागात असलेल्या जीएमडी मार्केट समोर असलेल्या 'कप ऑफ कम्फर्ट' नावाच्या कॅफेमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचं आमिष दाखवत 29 वर्षीय तरुणाने 33 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे अकोल्यातील काही कॅफेमध्ये सुरू असलेल्या 'स्पेशल केबिन' सुविधेमधून गैरप्रकार घडत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात शुभम गजानन टाले (वय 29, रा. सांगवी मोहाडी, अकोला) याच्याविरोधात BNS कलम 64, 64(2)(m) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती वारंवार मारहाण करायचा, त्यामुळे ती वेगळी राहू लागली होती. याच दरम्यान शुभम टाले या तरुणाशी तिची सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीतून मैत्री वाढत गेली आणि शुभमने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर तिला ‘कप ऑफ कम्फर्ट’ कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Embed widget