एक्स्प्लोर

Pravin Gaikwad attack: संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा अखेर मैदानात उतरला, पहिली प्रतिक्रिया

Maratha Kranti Morcha on Pravin Gaikwad attack: या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे.

Maratha Kranti Morcha on Pravin Gaikwad attack: अक्कलकोट (सोलापूर) येथे रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकून धक्कादायक हल्ला करण्यात आला. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना त्यांच्या गाडीसमोर काही लोकांनी आक्रमकपणे शाई फेकली आणि त्यांना खाली खेचून धक्काबुक्की केली. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. दीपक काटे (भाजप युवा मोर्चा राज्य सचिव), किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह सात जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पाच आरोपी फरार आहेत.  

अशा पद्धतीने हल्ला हे भ्याड कृत्य

दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक आणि हल्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. प्रवीण गायकवाड हे कुटुंबासहित असताना अशा पद्धतीने भ्याड हल्ला करणे हे अत्यंत निषेधार्ह असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की,  संविधानाने प्रत्येकाला आंदोलन मोर्चा करण्याचा अधिकार पण अशा पद्धतीने हल्ला हे भ्याड कृत्य आहे. मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.

हल्ल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट

या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकर, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रवीणदादांना त्वरित फोन करून परिस्थितीची चौकशी केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर येथे गायकवाड यांचा दुग्धाभिषेक करत जोरदार स्वागत केले. या घटनेमुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली असून राजकीय वातावरणही तापले आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. पोलिस तपास सुरू असून पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! लबाड लांडग्यांनी शिकार केली, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं उचललं टोकाचं पाऊल, फेसबुक पोस्ट करत संपवलं जीवन, बीड हादरलं 
धक्कादायक! लबाड लांडग्यांनी शिकार केली, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं उचललं टोकाचं पाऊल, फेसबुक पोस्ट करत संपवलं जीवन, बीड हादरलं 
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
राज्यात ऑपरेशन टायगर नाही, पण ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंकडे गेले असतील तर... नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
राज्यात ऑपरेशन टायगर नाही, पण ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंकडे गेले असतील तर... नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा

Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Embed widget