एक्स्प्लोर

प्रवीणदादांना आमच्याबद्दल कोणीतरी गैरसमज करुन देतोय, जन्मेजयराजे भोसलेंचं स्पष्टीकरण, म्हणाले,  त्यांच्याबद्दल असा विचार शक्यच नाही

Solapur : प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचे स्पष्टीकरण दिलं आहे.

Solapur :  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) यांना रविवारी (13 जुलै) अक्कलकोट (Akkalkot) येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. अक्कलकोट (Akkalkot) येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कारनिमित्त प्रवीण गायकवाड हे रविवारी पत्नीसह अक्कलकोटला आले होते. गाडीतून उतरून ते कार्यक्रमस्थळी जात असताना इंदापूरहून अक्कलकोटला गेलेले दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर काळी शाई ओतली. दरम्यान, या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचे स्पष्टीकरण दिलं आहे. प्रवीण दादा गायकवाड यांना आमच्याबद्दल कोणीतरी गैरसमज करुन देत आहेत. प्रवीण दादांचे समाजासाठीचे योगदान मोठे आहे, त्यांच्याबद्दल असा विचार शक्यच नसल्याचे जन्मेजयराजे भोसले म्हणाले. 

काही विघ्न संतोषी लोकांनी हे कृत्य घडवून आणलं

काही विघ्न संतोषी लोकांनी हे कृत्य घडवून आणल्याची माहिती जन्मेजयराजे भोसले यांनी दिली आहे. ज्यांनी हे केलं त्यांच्याशी आमचा कोणतेही संबंध नाही. घटनेच्या दिवसापासून आम्ही प्रवीण दादा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय पण संपर्क होतं नसल्याचे जन्मेजयराजे भोसले म्हणाले. मी स्वतः त्यांना व्हॉट्सअपवर मसेजही केला आहे.

शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती मिळाली आहे.  दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे. 

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अनेकांनी तीव्र निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरात घरात पोहोचवण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. खरा इतिहास सांगणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत आणि विकृती सांगणाऱ्यांना अभय दिला जातोय. तुम्ही जी विकृती तयार कराल ती ठेचण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आज जो प्रकार घडला आहे त्याला योग्य तेच उत्तर आम्ही देणार असल्याची भूमिका मराठा सेवा संघाने मांडली आहे.  विचाराचा लढा विचाराने देऊ. तुम्ही जर कायदा हातात घेणार असाल तर याला सुद्धा आम्ही आमच्या भाषेत उत्तर देणार असल्याचा इशारा मराठा सेवा संघाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

हल्ला करणारा दीपक काटे कोण? खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं भाजप कनेक्शन; फडणवीसांनाही लक्ष्य केलं

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget