दीपक काटेच्या कानात अमोलराजे भोसले काय बोलले? राड्यानंतर व्हायरल व्हिडिओवर जन्मजेयराजेंचं स्पष्टीकरण
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin gaikwad) यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या शाईफेकीच्या घटनेनं राज्यभरात त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तर, ज्या जन्मजेयराजे राजे भोसले यांच्या नागरी सत्कार समारंभासाठी ते जात होते, त्या कार्यक्रमात नेमकं गोंधळ का उडाला? भोसले यांच्याकडूनच हल्लेखोरांना मदत करण्यात आली होती का, त्यानुसारच हा हल्ल्याचा कट रचला का, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा होत आहे. त्याच अनुषंगाने आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा (Maratha) समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते. मात्र, या बैठकीत राडा झाला, एका व्हायरल व्हिडिओचा दाखल दाखला देत काहींनी भोसले यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत प्रश्न विचारले. आता, जन्मजेयराजे भोसले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. त्यामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूरहुन आलेल्या अॅड. रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख केला. यावेळी अॅड. रोहित फावडे याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले? असा आरोप केला, तसेच एका व्हिडिओचा संदर्भतही त्याने दिला होता.
सोलापूरच्या बैठकीत जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख आणि आरोपनंतर जन्मजेयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. आक्रमक समर्थक रोहित फावडे याच्या अंगावर धावून गेले, यावेळी या तरुणाला मारहाण देखील करण्यात आली. बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला, काहीच वेळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि रोहित फावडे याला पोलिसांनी बाहेर काढलं. आता घडल्या प्रकारावर भोसले यांनी आपली बाजू मांडली असून व्हायरल व्हिडिओवर देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
जन्मजेयराजे भोसलेंचा खुलासा
सकल मराठा समाजाची सुरळीत बैठक सुरु होती. मात्र, पंढरपूरच्या वकिलाने माझ्याबद्दल चुकीचे बोलल्यामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. याउलट माझा मुलगा अमोलराजेने दीपक काटे याला सज्जड दम दिला आहे. सभेमध्ये बोलत असणारा युवक हा चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत होता. माझा मुलगा अमोल याने दीपक काटेला घडलेलं कृत्य चुकीचे झाले आहे, असे त्याला सांगितले होते असा व्हायरल व्हिडिओचा खुलासाच जन्मजेयराजेंनी केला. या व्हायरल फोटो आणि व्हिडिओमुळेच, त्यांचा गैरसमज झालेला आहे, असेही जन्मजेयराजे भोसलेंनी म्हटले आहे.
हेही वाचा
शशिकांत शिंदेंना जबाबदारी का? शरद पवारांनी सांगितलं राज'कारण', जयंत पाटलांचंही कौतुक

























