एक्स्प्लोर

Solapur : प्रवीण दादांवरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला, 18 जुलैच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा; जन्मजेयराजे भोसले यांची प्रतिक्रिया

Solapur : येत्या 18 तारखेच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. प्रवीण दादावरचा (Praveen Gaikwad) हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया जन्मेजयराजे भोसले यांनी दिली आहे.

Solapur : येत्या 18 तारखेच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. प्रवीण दादावरचा (Praveen Gaikwad) हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया अक्कलकोट (Akkalkot) येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी दिली आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक निषेधार्थ 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. काल (15 जुलै) यासंदर्भात सोलापुरात बैठक सुरू असताना मोठा गोंधळ झाल्याने जन्मजेयराजे भोसले हे  बैठकीतून निघाले होते. या बैठकीत जन्मजेयराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख एका तरुणाने केल्याने मोठा वाद झाला होता. या वादानंतर अक्कलकोट बंद संदर्भात जन्मजेयराजे भोसले काय भूमिका घेतात हा प्रश्न चर्चेत होता, यावर आता त्यांनी स्वत: स्पष्टीकरण देत प्रतिक्रिया दिली आहे.  सोबतच अक्कलकोट बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. 

मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचा एकमताने अक्कलकोट बंदचा निर्णय

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही फेक विरोधात 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचा एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. फरार आरोपींना तात्काळ अटक करा, सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी सोलापुरातील विश्रामगृह येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीतनंतर करण्यात आली आहे. अमोल राजे भोसले यांच्या संदर्भात एका कार्यकर्त्याला गैरसमज झाला होता. या गैरसमजुतीतून हा गोंधळ उडाला. मात्र त्यानंतर बैठक सुरळीत पार पडली. यावेळी समाजाच्या बैठकीत झालेल्या गोंधळानंतर मराठा समाज समन्वयकांनी माहिती देत  18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची माहिती दिली. अक्कलकोट बंदच्या संदर्भाने नियोजन करण्यासाठी आज अक्कलकोटमध्ये नियोजन बैठक होणार आहे. या बैठकीत जन्मजेयराजे भोसले हे देखील सहभागी होतील. अशी माहिती मराठा समाज समन्वयकांची बैठकीनंतर दिली.

चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटेचे गॉडफादर- प्रवीण गायकवाड 

दुसरीकडे,  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले. चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटे (Deepak Kate) याचे गॉडफादर आहेत. त्यांच्याकडून दीपक काटेला राजकीय पाठबळ आणि पाठिंबा पुरवण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: तुझ्या पाठीशी आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जाहीर सभेत सांगितल्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. त्यामुळे माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला.

दीपक काटे आणि भाजप नेत्यांचे व्हिडीओ दाखवले. त्यापैकी एका व्हीडिओत चंद्रशेखर बावनकुळे हे दीपक काटेला उद्देशून म्हणत आहेत की, मागच्या सरकारने दीपक काटेला गुन्हेगार ठरवले होते. पण मला तुमचा गर्व आहे. तुम्ही आता काम करा, तुमच्यावर जबाबदारी देऊ. घाबरु नका, तुमच्यामागे देवेंद्र भाऊ आणि मी आहे, असे बावनकुळे या व्हीडिओत म्हणत आहेत. दीपक काटे याच्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुन्हेगाराला भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस पद दिले जाते. गंभीर गुन्ह्यात दीपक काटेला जामीन मिळवून देणे, हे गंभीर स्वरुपाचे आहे. संघाच्या बैठकीत बहुजन संघटना संपवण्याची रणनीती आखण्यात आली होती. त्यानुसार दीपक काटेला एक टास्क देण्यात आला आहे.असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Shinde On Eknath Shinde: शिवसेनेच्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं; म्हणाले, जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?
शिवसेनेच्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं; म्हणाले, जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?
Mahesh Shinde: मला पहिल्यापासून वेगळी वागणूक, एकनाथ शिंदेंच्या सभेचं निमंत्रणही नाही...; शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंनी सगळं सांगितलं, साताऱ्यातील अंतर्गत नाराजी उफाळणार?
मला पहिल्यापासून वेगळी वागणूक, एकनाथ शिंदेंच्या सभेचं निमंत्रणही नाही...; शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंनी सगळं सांगितलं, साताऱ्यातील अंतर्गत नाराजी उफाळणार?
Mangal Transit 2026: आधी मोठी उलथापालथ, आता मंगळ 4 राशींच्या आयुष्यात करणार चमत्कार! पॉवरफुल रूचक राजयोग, 'मे' मध्ये गरिबीकडून थेट श्रीमंतीकडे!
आधी मोठी उलथापालथ, आता मंगळ 4 राशींच्या आयुष्यात करणार चमत्कार! पॉवरफुल रूचक राजयोग, 'मे' मध्ये गरिबीकडून थेट श्रीमंतीकडे!
Bigg Boss Marathi: महाट्रॉफी, 15 लाख अन्... रितेश भाऊंकडून तन्वी कोलतेला मिळाली खास भेटवस्तू, झाली भावुक
महाट्रॉफी, 15 लाख अन्... रितेश भाऊंकडून तन्वी कोलतेला मिळाली खास भेटवस्तू, झाली भावुक

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026: सचिन, सेहवाग, द्रविडसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं का घडलं?
सचिन, सेहवाग, द्रविडसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं का घडलं?
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Embed widget