एक्स्प्लोर

Solapur Crime News : तुमचे देव सैतान, त्यांना पाण्यात फेकून आमचा धर्म स्वीकारा! सोलापूरात धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या फादरवर गुन्हा दाखल

Solapur Crime News : धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या एका कथित फादरविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Solapur Crime News : सोलापुरातील (Solapur) सेटलमेंट परिसरात एका फादर विरोधात धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तुमचे देव शैतान आहेत, त्यांना पाण्यात टाकून आमचे धर्म स्वीकारा. तुम्हाला 10 हजार रुपये दिले जातील. असे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या एका कथित फादर विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रवी फादर असे या 55 वर्षीय कथित फादरचे नाव आहे. (Solapur Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय रवी फादर याने सोलापुरातील सेटलमेंट परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये चर्च तयार केले होते. तेथे त्याने महिलांना सांगितले की, "तुमचे देव शैतान आहेत, आणि ते तुमचे कल्याण करणार नाही. त्यांना पाण्यात टाकून आमचे देव स्वीकारा. आम्ही तुम्हाला 10 हजार रुपये देऊ, " असे आमिष दाखवले. 

लाल रंगाचे पेय आणि ब्रेड खाण्यासाठी दिले, महिलांचा आरोप

20 जुलै रोजी रवी फादर याच्या चर्चमध्ये काही महिलांना या प्रकाराचा अनुभव आला. रवी फादर याने महिलांना वाईन सदृश्य लाल रंगाचे पेय आणि ब्रेड खाण्यासाठी दिले, असा आरोप महिलांनी केला आहे. यानंतर संबंधित महिलांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी कथित फादर रवी फादर याच्या विरोधात सोलापूरच्या सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

सोलापूरमध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ

दरम्यान, सोलापूर शहरात घरफोडीच्या उद्देशाने ‘चड्डी गँग’ पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं समोर आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान शहरातील वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी या परिसरांमध्ये चार संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत असल्याचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे या चौघांनी चेहऱ्यावर कापड बांधलेलं असून, काळा टी-शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेली होती. त्यांच्या हातात दगड आणि घरफोडी करताना उपयोगात येणारी काही साधनं असल्याचं देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलं आहे. या गँगकडून घरांची पाहणी करून नंतर चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी दाराच्या बाहेर असलेल्या वस्तू हलविल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी तत्काळ पावलं उचलून ‘चड्डी गँग’ला ताब्यात घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.    

आणखी वाचा 

Ahilyanagar Crime News : ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget