एक्स्प्लोर

Solapur crime: सोलापूर हादरलं ! क्षुल्लक कारणावरून सावत्र आईनं 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

Solapur crime:तिची सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे (वय ३३) हिनेच तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी तेजस्विनीला अटक केली आहे.

Solapur Crime : "जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही," अशा क्षुल्लक कारणावरून 3 वर्षांच्या चिमुकलीचा सावत्र आईने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मुलीचा छळ आणि तिच्या मृत्यूमागील क्रूरता समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

ही संतापजनक घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत मुलीचे नाव कीर्ती नागेश कोकणे (वय ३) असे असून, तिची सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे (वय ३३) हिनेच तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी तेजस्विनीला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागेश कोकणे हे दुसरी पत्नी तेजस्विनी हिच्यासह वडवळ स्टॉप येथे भाड्याने राहतात. त्यांच्या बरोबर पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुली कीर्ती आणि आकृतीही राहत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून तेजस्विनी या दोन्ही मुलींवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होती. ती मुलींना क्षुल्लक कारणावरून मारहाण करत असल्याचे शेजाऱ्यांनीही यापूर्वी वेळोवेळी सांगितले होते.

शुक्रवारी सकाळी कीर्तीने नाश्ता करण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या तेजस्विनीने तिला अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तेजस्विनी कोकणे हिच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत असून, घरातील इतर सदस्यांचीही चौकशी सुरू आहे.

ही घटना अत्यंत वेदनादायी असून, समाजात अजूनही सावत्र नात्यांतील विष, क्रौर्य आणि निर्दयता किती भयंकर स्वरूप धारण करू शकते, याचा हा जिवंत दाखला आहे. वडवळसारख्या छोट्या गावात अशा प्रकारचा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि चीड निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget