Solapur Crime: तेरा महिन्याच्या बाळाचा तलावात पडून दुर्दैवी मृत्यू; जड अंत:करणाने अंत्यसंस्कार केले, मामाचा एका फोननंतर बॉडी उकरुन काढली, नेमकं काय घडलं?
Solapur Crime News: सोलापूरच्या कुमठे गावातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात गावातील एका तलावात पडून तेरा महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Solapur Crime News: सोलापूरच्या कुमठे गावातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात गावातील एका तलावात पडून तेरा महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या मृत्यूच्या घटनेनंतर कुटुंबियांसह कुमठे गावात एकाच शोककळा पसरली आहे. अशातच या 13 महिन्याच्या मुलाला अंत्यसंस्कार करून आई वडिलांनी या बाळाला पुरलंय. मात्र बाळाच्या मामाला या घटनेवर संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. मामाच्या तक्रारीनंतर या मृत बाळाचा मृतदेह (Crime News) बाहेर काढण्यात आला आणि तो मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या मृत्युचं कारण आता कळू शकणार आहे.
मामाचा एका फोननंतर बॉडी उकरुन काढली, सोलापुरात खळबळ
सोलापूरच्या कुमठे गावातील ही घटना असून या घटनेचा अधिक तपास सोलापूरच्या विजापूर नाका पोलिसांकडून सुरु आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ नीलकंठ मामुरे असे 13 महिन्यांच्या मृत मुलाचे नाव आहे. आई- वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काल (13 जुलै) सकाळी 10 वाजता विश्वनाथ खेळताना शेततळ्यात बुडाला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजता आम्ही विधिवत मुलावर अंत्यसंस्कार केले. मात्र या घटनेची कोणतीही माहिती न देता आई-वडिलांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याने मृत मुलाच्या मामाने पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नायब तहसिलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह रात्री बाहेर काढला. सध्या पुढील कारवाईसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय. शवविच्छेदनाच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
माझ्या भाच्याचा मृत्यू अनैसर्गिक, मामाची तक्रार
दुसरीकडे, या प्रकरणी मृत झालेल्या बाळाचे मामा स्वप्नील धर्मराज भरमची (वय 25, रा. सोलापूर) यांनी 112 वर फोन करुन या प्रकरणावर आक्षेप घेतला आहे. विश्वनाथचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याची तक्रार त्यांनी केलीय. यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लगेच घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केलाय. त्यांनी याबाबत तहसीलदार हेडगीरे यांच्या परवानगीने रात्री पुरलेला मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, विश्वनाथच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आज (सोमवारी) होणार आहे. त्यामुळे शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























