अक्कलकोट बंदची घोषणा, आरोपींवर मोक्का? सोलापुरातील मराठा समाजाच्या बैठकीत काय-काय ठरलं?
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक विरोधात 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची ( Akkalkot bandh) हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Sambhaji Brigade Praveen Gaikwad ) यांच्यावर रविवारी शाईफेक करण्यात आली होती. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज सोलापुरात मराठी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक विरोधात 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची ( Akkalkot bandh) हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच फरार आरोपींना तात्काळ अटक करा, सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
अक्कलकोट बंदच्या संदर्भाने नियोजन करण्यासाठी उद्या पुन्हा बैठक
सोलापुरातील विश्रामगृह येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीतनंतर महत्वाच्या समन्वयांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अमोल राजे भोसले यांच्या संदर्भात एका कार्यकर्त्याला गैरसमज झाला होता. गैरसमजुतीतून गोंधळ उडाला मात्र नंतर बैठक सुरळीत पार पडली अशी माहिती मराठा समाज समन्वयकांची बैठकीनंतर दिली आहे. अक्कलकोट बंदच्या संदर्भाने नियोजन करण्यासाठी उद्या अक्कलकोटमध्ये नियोजन बैठक होणार आहे. अक्कलकोट बंदमध्ये जन्मजेयराजे भोसले हे देखील सहभागी होतील, असी माहिती मराठा समाज समन्वयकांनी बैठकीनंतर दिली आहे.
मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ का उडाला?
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकनंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक आयोजीत केली होती. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. यामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूरहून आलेल्या अॅड. रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख केला होता. यावेळी अॅड. रोहित फावडे याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले? असा आरोप केला होता. याच ऐकरी उल्लेख आणि आरोपनंतर जन्मजेयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते.
आक्रमक समर्थक अॅड. रोहित फावडे याच्या अंगावर धावून गेले. यावेळी फावडेला प्रचंड मारहाण करण्यात आली आहे. यावेळी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला आणि बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काहीच वेळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झालेय यानंतर अॅड. रोहित फावडे याला पोलिसांनी आधी बाहेर काढलं. त्यानंतर जन्मजेयराजे भोसले आणि त्यांचे समर्थक बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेले आहेत. पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मराठा समाजाची बैठक पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:























