Surya Shani Yuti 2025 : कुंभ राशीत सूर्य-शनीचा जुळणार ताळमेळ; 14 मार्चपर्यंत 'या' 3 राशी राहतील 'टेन्शन फ्री', शनीची राहील कृपा
Surya Shani Yuti 2025 : कुंभ राशीत शनी आणि सूर्याची युती जुळून येणार आहे. याचा काही राशींच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे.

Surya Shani Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीत सूर्य आणि शनी (Shani Dev) एकत्र आहेत. सूर्य (Sun) ग्रहाने 13 फेब्रुवारी रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला. 14 मार्चपर्यंत तो याच स्थितीत असणार आहे. अशा प्रकारे कुंभ राशीत शनी आणि सूर्याची युती जुळून येणार आहे. याचा काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
सूर्य आणि शनी हे एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. मात्र, कुंभ राशीत येण्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या ग्रहांची युती पाहायला मिळणार आहे. हा काळ ग्रहांच्या युतीत सर्वात महत्त्वाचा काळ असणार आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
सूर्य धनु राशीच्या नवव्या चरणाचा स्वामी आहे. सूर्य-शनीची युती तिसऱ्या चरणात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी ही युती फार अनुकूल असणार आहे. या काळात तुम्हाला सामाजिक क्षेत्रात चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, तुमच्यात आत्मविश्वास भरभरून असेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या सहाव्या चरणात सूर्य आणि शनीची युती होणार आहे. याचा सकारात्मक प्रभाव कन्या राशीच्या लोकांवर होणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील.तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक आनंदाचे क्षण येतील. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
सूर्य आणि शनीच्या युतीने वृषभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. या काळात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : आज धन योगासह जुळून आला शश राजयोग; वृषभसह 'या' 5 राशींना अचानक होणार धनलाभ, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
