Shani Uday 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर मीन राशीत शनीचा होणार उदय; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु, पदरात पडेल पुण्य
Shani Uday 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी 28 फेब्रुवारी रोजी आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत अस्त होणार आहे. या अवस्थेत शनी 37 दिवसांपर्यंत स्थित असणार आहेत.

Shani Uday 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीला (Shani Dev) सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनी (Lord Shani) हा एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात हळुवार गतीने चालतो. शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. शनीच्या राशी परिवर्तनाबरोबरच शनी वेळोवेळी आपल्या स्थितीत देखील बदल करतात. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी 28 फेब्रुवारी रोजी आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत अस्त होणार आहे. या अवस्थेत शनी 37 दिवसांपर्यंत स्थित असणार आहेत. तर, 6 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी शनीचा उदय होणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. या कालावधीत शनी एकादश स्थिती उदय होणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या लोकांना याचा चांगलाच लाभ मिळेल. तसेच, नोकरीत येणाऱ्या समस्या दूर होतील. प्रत्येक क्षेत्रात तुमचा विकास होईल. इतकंच नव्हेतर, व्यापारी वर्गाला देखील याचा चांगला लाभ मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीचा उदय होणं मिथुन राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात तुमचा चांगला विकास झालेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल मात्र, खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्याचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं चांगलं कौतुक केलं जाईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असेल. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असणार आहे. तसेच, जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करतायत त्यांच्या बुद्धीचा चांगला विकास होईल. विविध स्त्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : आज इंद्र योग आणि मालव्य राजयोगाचा जुळून आला महासंयोग; मेषसह 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा, लवकरच होणार मालामाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
