एक्स्प्लोर

Sindhudurg Agriculture : हत्ती गावाच्या वेशीवर येताच मिळणार अलर्ट, पाहा शेतकऱ्यांनी काय केली उपाययोजना?

तिलारी खोऱ्यात हत्तींना प्रतिबंध करण्यासाठी मोर्ले गावात शेतकऱ्यांनी आता सेन्सर सायरन बसवले आहेत. त्यामुळे हत्ती आल्याचा अलर्ट मिळणार आहे.

Sindhudurg Agriculture news : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींना प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्या उपाययोजना अपयशी ठरल्या. आता तिलारीतील मोर्ले गावात 'कोरबेटी फांऊडेशन बांदा' यांनी सेन्सर सायरन बसवले आहेत. हत्ती त्या मार्गावरुन जर जात असतील तर हा सायरन आपोआप वाजणार आहे. हत्तीच्या ये जा करण्याच्या मार्गावर 100 मिटरच्या अंतरावर हे सायरन बसवले आहेत.

सायरनचा आवाज येताच त्या मशीनला बसवलेल्या लाईट चालू होतील. हे मशीन प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आल्या आहेत. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने हे मशीन मोर्ले गावात बसवण्यात आले आहेत. त्यामुळे हत्ती गावच्या वेशीवर येताच गावकऱ्यांना अलर्ट मिळणार आहे.

Sindhudurg Agriculture : हत्ती गावाच्या वेशीवर येताच मिळणार अलर्ट, पाहा शेतकऱ्यांनी काय केली उपाययोजना?

तिलारी खोऱ्यात हत्तींचा उच्छाद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींनी उच्छाद मांडला आहे. अन्न व पाणीसाठा यामुळे तिलारीत विसावलेल्या रानटी हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू या बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत. मे महिन्याच्या हंगामात फणस खाण्यासाठी कधी कधी रात्रीच्या वेळेस हे हत्ती अगदी घरालगत येत आहेत. 

नागरिक भितीच्या छायेखाली

हत्तीचा असा वावर वाढल्यानं शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. तर कधी कधी भर रस्त्यावर हत्तींचा कळप नजरेस पडत असल्याने ग्रामस्थांचा भीतीनं थरकाप उडत आहे. हत्तींना रोखण्यासाठी वनविभागाने केलेल्या उपाययोजना तकलादू पडल्या आहेत. आता तर हत्तीचा वावर लोकवस्तीत वाढू लागल्याने तिलारी खोऱ्यातील हत्तींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत. त्यामुळे लवकर याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसात हत्तींना मोठ्या प्रमाणात फणसाच नुकसान केले आहे, त्यामुळे फणसाचे उत्पादन कमी झाले आहे.  तसेच नारळाची, केळीची बाग, बांबू याचेदेखील हत्तींनी मोठं नुकसान केलं आहे. शासन याठिकाणी कोणतेही लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगतिले. नुकसानग्रस्तांना तुटपुंजी मदत शासन करते. त्यांनी भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget