Rahul Gandhi Resigns | राहुल गांधीच कॉंग्रेसचे अध्यक्ष राहणार, रणदीप सुरजेवालांची माहिती | नवी दिल्ली | ABP Majha
राहुल गांधींना निर्णय घेण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन त्यांना अध्यपद द्यावं यासाठी त्यांची मनधरणी सुरु आहे. काही अटी-शर्थींसह राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पदी कायम राहण्याचं मान्य केल्याचं कळलं आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. राहुल गांधींना राजस्थानमध्ये अशोक गहलोतांऐवजी सचिन पायलट आणि मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या ऐवजी ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचं होतं.
पक्षातील ज्येष्ठांनी विरोध केल्यानं त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे आपल्याला हवं तसं काम करता येत नसल्यानं पक्षाध्यक्षपदापेक्षा संघटनात्मक बांधणीसाठी काम करण्याची इच्छा राहुल गांधींनी व्यक्त केली होती. तरी, आज सकाळपासून अहमद पटेल, प्रियांका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधींना समजावलं आणि राहुल यांनीही काही अटी-शर्थींसह काँग्रेस अध्यक्षपदावर कायम राहण्याचं मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.