एक्स्प्लोर

Why Indian Students Visit Ukraine : डॉक्टर होण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पसंती युक्रेनलाच का?

Russia-Ukraine War : सध्या जगभरात एकाच विषयवार चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे, युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध. या युद्धाचे पडसाद आता जगभरात उमटू लागले आहेत. एकीकडे तेलाची किंमत वाधारली आहे. तर दुसरीकडे भरतासह अनेक देशांमध्ये शेअर मार्केट चांगलच गडगडलं आहे. आताच्या परिस्थितीबाबत बोलायचं झालं तर रशियन आर्मीनं युक्रेनच्या खारकिवी हा दुसऱ्या मोठ्या शहरात प्रवेश केला आहे. तर युक्रेनची राजधानी किव्हकवर रशियाचं (Russia) सैन्य मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. सॅटेलाईट फोटोवरुन दावा करण्यात आला आहे की, रशियन सैन्य किव्हवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे या युद्धात Nucelar शस्त्रांचा वापर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. या संपूर्ण परिस्थतीत भारतासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय रहिवाशी. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातील अनेकजण हे medical चे विद्यार्थी आहेत. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारतीय सैन्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच भारतानं युक्रेनमधील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना Airlift करणं सुरू केलं आहे. 

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झालं आणि युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या समोर येऊ लागली. अनेक विद्यार्थ्यांचे मदतीसाठी आर्जवं करणारे व्हिडीओ व्हायरल झाले. अशातच सर्वांसमोर पडलेलं कोडं म्हणजे, एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी का जातात? यामागील काही कारण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये असं समोर आलं की, सर्वाधिक विद्यार्थी हे MBBS चं शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला जातात. 

भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनलाच का जातात? 
 
अनेकांना प्रश्न पडलाय की, भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनलाच का जातात? नेमकी काय कारणं आहेत? जाणून घेऊया सविस्तर... 

जगभरात कुठेही शिक्षण घ्यायचं झालं तर पैसा लागतो. पैसा म्हणजे, जगण्यासाठी लागणारी मूलभूत गरज असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यातल्या त्यात भारतीय, भविष्यासाठी पैशांची बचत करण्यात माहीर. हाच मुद्दा युक्रेन आणि MBBS चं शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत महत्त्वाचा आहे. युक्रेनमध्ये शिक्षणाचा खर्च भारतापेक्षा कमी आहे. म्हणजेच, 6 वर्षांच्या Medical कोर्ससाठी युक्रेनमध्ये 12 ते 18 लाख खर्च होणार असेल, तर भारतात प्रायव्हेट कॉलेजमध्ये तोच खर्च 80 लाख ते 1 कोटीपर्यंत जातो. त्यात युक्रेनमध्ये 30 हुन अधिक Medical कॉलेजेस असून Infrastructure वर त्या सरकारनं जास्त भर दिला आहे. त्यामुळे कमी खर्च आणि उत्तम सुविधेसह युक्रेनमध्ये वैद्यकिय शिक्षण पूर्ण करता येतं. त्यासोबतच महत्त्वाची बाब म्हणजे,  युक्रेनच्या Medical अभ्यासक्रमाला जगाची मान्यता आहे. युक्रेनच्या शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, '2020 साली भारतातून 18 हजार 95 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आले होते.' हा आकडा एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या 24 टक्के इतका होता.

अमेरिकेशी तुलना केल्यास युक्रेनमध्ये शिक्षणाचा खर्च किती? 

वैद्यकिय शिक्षणासाठी इतर देशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर असणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, तिथे राहण्याचा आणि खाण्याचा खर्च. इतर देशांत शिक्षणासाठी जाताना त्या देशात घरभाड किती असेल? हा प्रश्न कुणालाही पडू शकतो. तर युक्रेनमध्ये अमेरिकेपेक्षा 76 टक्के कमी घरभाडं आहे. म्हणजेच, अमेरिकेत तुम्ही 1000 रुपये देत असाल, तर युक्रेनमध्ये फक्त तुम्हाला 250 ते 300 रुपयेच द्यावे लागतात. काही ठिकाणी तर अमेरिकेत युक्रेनपेक्षा 300 टक्के जास्त घर भाडं आहे. आता त्यानंतर महत्वाचं म्हणजे, जेवणाचा खर्च. तर अमेरिकत जेवणाचा खर्च युक्रेनपेक्षा 180 ते 186 टक्के जास्त आहे. तितकाच फरक किराणा सामान खरेदी करताना तुम्हाला जाणवेल.
 
स्पर्धा हे सुद्धा भारताहून युक्रेनला जाण्याचं कारण, ते कसं? 

अजून एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे, भारतात 2021 साली 15 लाख विद्यार्थ्यांनी NEET ची परीक्षा दिली. आणि जागा होत्या फक्त 88120. त्यामुळे स्पर्धा हे सुद्धा भारतीय विद्यार्थ्यांचं वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्यामागील एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यामुळेच भारतीय युक्रेनला पसंती देतात. कमी प्रवेश फी, राहण्या खाण्याचा खर्चही  कमी आणि महत्वाचं म्हणजे कमी स्पर्धा. यामुळेच भारतातील विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला जातात. 

विश्व व्हिडीओ

Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा
Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Embed widget