PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
गेल्या दहा वर्षात भारत आणि इस्रायलमधील मैत्रीचे संबंध चांगलेच वाढलेत. मैत्रीच्या याच अध्यायात आता नवा कळस रचला जातोय. पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा इस्रायल दौऱ्यावर पोहोचलेत. मात्र यंदाचा हा इस्रायल दौरा अनेक अर्थांनी वेगळा आहे. एकीकडं अमेरिका आणि इस्रायल इराणवरील हल्ल्याची तयारी करत असताना पंतप्रधानांचं इस्रायलमध्ये जोरदार स्वागत झालंय. त्यामुळं पश्चिम आशियातील राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय इस्रायलसोबत काही नवे करार होणं अपेक्षित असून त्यामुळं भारताची ताकद वाढणार आहे. पंतप्रधानांच्या या इस्रायल दौऱ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
पंतप्रधान नरेद्र मोदींचा दोन दिवसांचा महत्त्वाकांक्षी इस्रायल दौरा सुरु झालाय. २५ आणि २६ फेब्रुवारी या दोन दिवसात भारत आणि इस्रायल मैत्री अध्यायात नवा कळस गाठला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी २०१७ नंतर दुसऱ्यांदा इस्रायल दौऱ्यावर पोहोचलेत.मोदींच्या स्वागतासाठी इस्रायलच्या संसदेला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांनी मोदींचं स्वागत केलं.
























