Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आता खामेनींचा मोठा मुलगा मोजतबा खामेनींची निवड झालीय. इराणच्या मीडियाने ही माहिती दिलीय. खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं. खामेनींचा वारसदार कोण होणार याची उत्सुकता होता. त्यावर आता मोजतबा खामेनींची निवड या पदावर झालीय.
इराणचे सर्वेसर्वा खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावर सर्वोच्च नेता कोण असावा यासाठी असेंब्ली ऑफ एक्सपर्टस् अर्थात वरिष्ठांची बैठक सुरू होती. त्या बैठकीवरच इस्रायलने जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवला. कोम शहरात सुरू असलेल्या या बैठकीत इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते जमा झाले होते. त्याची खबर लागताच इस्रायलने या सभेलाच लक्ष्य केलं. वरिष्ठांच्या सभेत ८८ सदस्य असतात. युद्ध सुरू झाल्यावर त्यातले कितीजण शिल्लक होते याची माहिती नव्हती. मात्र सभेसाठी अनेकजण आले असल्याची माहिती होती. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते मारले गेलेत. अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेतेही मारले गेलेत. त्यातच नेत्यांची निवड करणाऱ्या वरिष्ठांच्या सभेवरही इस्रायलने बॉम्बफेक केल्याने इराणचं नेतृत्वच संपल्याची स्थिती आहे. मंगळवारी इराणचे नवे संरक्षण मंत्री अल रेझाही हल्ल्यात मारले गेल्याची माहिती आहे. सध्या इराणमध्ये शिल्लक नेत्यांपैकी केवळ राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गुलाम हुसेन मोहसनी एजई आणि गार्डीयन काऊन्सिलचे सदस्य अली रझा आराफी प्रामुख्याने शिल्लक आहेत.
इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे.. इस्त्रायलनं पुन्हा एकदा इराणमधल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा स्थळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय....इस्त्रायलनं इराणच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला केला तसंच इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या इमारतीवरही निशाणा साधण्यात आला..तसंच लष्कराचं मुख्यालयही उद्धवस्त करण्यात आलं..राजधानी तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये भीषण स्फोट झाले असून काही भागांमध्ये आगीचे मोठे लोळ उठले... अनेक ठिकाणी धुराचे ढग पसरले....दरम्यान इराणमधील मृतांचा आकडा ७८७ वर गेल्याची माहिती समोर येतीय... तर ६५० हून अधिक अमेरिकन सैनिक मारल्य़ाचा दावा इराणी लष्कराने केलाय..
इराणच्या सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी बोलवण्यात आलेल्या ‘असेंबली ऑफ एक्सपर्ट्स’ सभेवर अमेरिका आणि इस्त्रायलने हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात बहुतेक सभा सदस्यांचा मृत्यू आणि बरेच जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे ईरानची टॉप लीडरशिप जवळजवळ संपुष्टात आली आहे. हा हल्ला खामेनेईच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी निवडीच्या निर्णायक प्रक्रियेला मोठा फटका आहे. हल्ल्यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता आणि नेतृत्व रिक्ततेची भीती वाढली आहे.
























