एक्स्प्लोर

मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर

West Bengal : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपालांच्या राजीनाम्यानं खळबळ उडाली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालच्या लोकभवनच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सी. व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा कोणत्या कारणामुळं दिला हे अद्याप समोर आलं नाही. बोस जवळपास साडेतीन वर्ष पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. लोकभवनमधील सूत्रांच्या माहितीनुसार  बोस यांनी दिल्लीत राजीनामा दिला आहे. 

सी.व्ही. आनंद बोस यांनी 17 नोव्हेंबर 2022 ला पश्चिम बंगालचं राज्यपाल पद स्वीकारलं होतं. पीटीआय सोबत बोलताना त्यांनी राजीनामा दिल्याचं मान्य केलं आहे. ते म्हणाले की होय मी राजीनामा दिला आहे. बोस यांनी मात्र, राजीनाम्याचं कारण सांगितलं नाही. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. बोस यांच्या अचानक राजीनाम्यामुळं हैराण आणि चिंताग्रस्त असल्याचं त्या म्हणाल्या. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ममता बॅनर्जी यांनी पोस्ट करत म्हटलं की  पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्या राजीनाम्याच्या अचानक आलेल्या बातमीमुळं हैराण आणि चिंताग्रस्त आहे.  ममता बॅनर्जी म्हणाल्या की बोस यांच्या राजीनाम्याचं कारण मला अद्याप माहिती नाही.  सध्याची परिस्थिती पाहता मला कोणतंही आश्चर्य वाटणार नाही कारण आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्या तरी राजकीय फायद्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला असावा. 

ममता बॅनर्जी पुढं म्हणाल्या की केंद्रीय गृहमंत्र्यांनी मला सांगितलं की आर. एन. रवि यांना पश्चिम बंगालचं राज्यपाल करण्यात येत आहे. अमित शाह यांनी निश्चित परंपरेनुसार माझ्याशी सल्लामसलत केली नाही.  अशा प्रकारची कामं भारतीय संविधानाच्या भावनेला कमजोर करतात आणि आपल्या संघराज्य रचनेवर हल्ला करतात. केंद्र सरकारनं को ऑपरेटिव्ह फेडरलिझ्मच्या सिद्धांताचा सन्मान केला पाहिजे. अशा प्रकारचे एकतर्फी निर्णय घेण्यापासून वाचलं पाहिजे जे लोकशाही पद्धती आणि राज्यांच्या सन्मानाला कमी करतात, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार लडाखचे उपराज्यपाल कवींद्र गुप्ता यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आणखी काही राज्यांचे राज्यपाल आणि उपराज्यपाल राजीनामा देऊ शकतात. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?

Embed widget