IND vs ENG Semi Final : इंग्लंडचा शेवटच्या क्षणी घात! भारताचा 7 धावांनी विजय; टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये एन्ट्री, बेथेलचं शतक पाण्यात...
IND vs ENG LIVE Update T20 World Cup Semi Final 2026 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या दुसऱ्या संघाचे आज नाव निश्चित होणार आहे.
LIVE

Background
IND vs ENG LIVE Update T20 World Cup Semi Final 2026 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या दुसऱ्या संघाचे आज नाव निश्चित होणार आहे. टीम इंडिया मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम येथे इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये उपांत्य फेरीत सामना होण्याची ही सलग तिसरी वेळ ठरणार आहे. मागील वेळी भारताने इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला रोमांचक सामन्यात हरवत ट्रॉफी उंचावली होती.
या स्पर्धेतील सुपर-8 फेरीत इंग्लंडने दमदार कामगिरी करत तिन्ही सामने जिंकले. त्यांनी श्रीलंका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांना पराभूत करून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. दुसरीकडे, भारताला सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांना हरवत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
IND vs ENG Semi Final : इंग्लंडचा शेवटच्या क्षणी घात! भारताचा 7 धावांनी विजय; टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये एन्ट्री, बेथेलचं शतक पाण्यात...
2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव केला.
उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 बाद 253 धावा केल्या.
प्रत्युत्तर इंग्लंडला फक्त 246 धावा करता आल्या.
भारताने उपांत्य फेरीत 7 धावांनी विजय मिळवला.
इंग्लंडकडून जेकब बेथेलने 48 चेंडूत 105 धावा केल्या, पण तो इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकला नाही.
इंग्लंडने सामन्यात जोरदार झुंज दिली, परंतु जसप्रीत बुमराहने 16 व्या षटकात 8 धावा आणि 18 व्या षटकात 6 धावा देऊन भारताचा विजय जवळजवळ निश्चित केला.
IND vs ENG Semi Final LIVE Update 2026 : हार्दिक पांड्याने पहिल्याच घावात इंग्लंडचा माज उतरवला; फिल सॉल्ट फक्त 5 धावांवर आऊट
हार्दिक पांड्याने भारताला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने फिल साल्टला आऊट केलं.
तो फक्त पाच धावा करू शकला.
आता हॅरी ब्रुक बटलरसोबत सामील झाला आहे.



















