Aaditya Thackeray Rajkot Fort : मागे वळले, राणेंकडे पाहिलं; टशन देत ठाकरेंना घोषणा दिली
सिंधुदुर्ग : मालवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरवे आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहणीसाठी आले त्यावेळी आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावरच राडा झाल्याचे पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला घेतले. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामरी झाली. यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरधार घोषणाबाजी करण्यात आली.
मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, अंबादास दानवे, भास्कर जाधव, विनायक राऊत हे मोर्चात सहभागी होतील. आज मालवणमध्ये भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.