Mahad MIDC Blast : बेपत्ता असलेल्या 11जणांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ दाखल : ABP Majha
महाडच्या MIDCमध्ये शुक्रवारी सकाळी ब्लूजेट कंपनीत मोठा स्फोट झाला. यामध्ये अडकलेल्या ११ कामगारांपैकी ४ जणांचे मृतदेह आढळून आलेत. उर्वरित कामगारांचा शोध सध्या सुरुये. . कामगारांना शोधण्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालंय. कंपनीच्या गेटबाहेर बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीय आक्रोश करतायेत. कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस नीट माहिती देत नसल्याचा आरोप हे कुटुंबीय करतायेत. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमाराला कंपनीत भीषण स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली, जी नियंत्रणात आणण्यात अनेक तास लागले. ७ तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या कंपनीला उत्पादनाची परवानगीच नव्हती, तरीही इथं काम सुरू होतं असा आरोप स्थानिकांनी केला.























